आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भोजपुरी इंडस्ट्रीत आहे या HOT अॅक्ट्रेसला डिमांड, जाणून घ्या हिच्याविषयी सारं काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः भोजपुरी अभिनेत्री प्रियांका पंडीत या इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तिला पदार्पणातच बेस्ट न्यूकमर अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आहे. प्रियांका भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. तिने 'लालीपॉप लागेलू' या गाजलेल्या भोजपुरी व्हिडिओत काम केले आहे. 'जीना तेरी गली में' या सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात करणा-या प्रियांकाने सिद्ध केले, ती या इंडस्ट्रीतसुद्धा आपले वेगळे स्थान निर्माण करु शकते. प्रियांका पंडीत मुळ गुजराती आहे.

जाणून घ्या कसा मिळाला भोजपुरी सिनेमा...
- प्रियांकाने सांगितले, की तिने 2013 मध्ये भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले.
- 'जीना तेरी गली में' या सिनेमात भोजपुरी स्टार प्रदीप पांडेय चिंटू होते.
(का आहे चर्चाः गेल्या आठवड्यात बिहारमध्ये रिलीज झालेला इच्छाधारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमात प्रियांकाची महत्त्वाची भूमिका आहे.)

'लालीपॉप लागेलू'मध्येही केले होते काम...
- प्रियांका भोजपुरी स्टार पवन सिंह, मनोज तिवारी, दिनेश लाल यादव 'निरहुआ', खेसारी यांच्यासह अनेक अॅक्टर्ससोबत मोठ्या पडद्यावर झळकली आहे.
- भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील गायक आणि खासदार मनोज तिवारी यांनी प्रियांकाच्या कामाचे कौतुक केले आहे.
- प्रियांकाने पवन सिंहसोबत लालीपॉप लागेलु या गाजलेल्या भोजपुरी व्हिडिओत काम केले आहे.

प्रियांकाला येत नाही भोजपुरी
- प्रियांकाचा जन्म अहमदाबाद येथे झाला असून तिला भोजपुरी भाषा येत नाही.
- गुजरातमध्ये लहानाची मोठी झाल्याने ती उत्तम गुजराती बोलते.
- प्रियांकाने अहमदाबाद कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
- भोजपुरी सिनेमांत कधी काम करायला मिळेल, असा विचारही तिने कधी केला नव्हता.
- मात्र जेव्हा दिग्दर्शकाने ऑफर दिली, तेव्हा तिने ती स्वीकारली.
प्रियांकाने डॉक्टर व्हावे अशी होती वडिलांची इच्छा
- मी डॉक्टर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. मात्र मला काही तरी वेगळे करायचे होते, असे प्रियांकाने सांगितले.
- एकदा तिच्या एका फ्रेंडने तिचे काही फोटोज एका गुजराती फिल्म डायरेक्टरला पाठवले.
- त्यानंतर तिला फोन आला आणि तिची निवड एका टीव्ही शोसाठी झाली.
- दरम्यान तिची भेट भोजपुरी दिग्दर्शक राजकुमार आर पांडेयसोबत झाली आणि त्यांनी तिला जीना तेरी गली में या सिनेमासाठी लीड अॅक्ट्रेस म्हणून साइन केले.

क्या आहे 'इच्छाधारी'मधील प्रियांकाची भूमिका...
- प्रियांकाने सांगितले, की तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय.
- सिनेमाची कहाणी इच्छाधारी नाग-नागिणीच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे.
- सिनेमात लव्ह ट्रॅँगल असून राणी चॅटर्जी, प्रियांका पंडित आणि यश मिश्राच्या भोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, प्रियांका पंडीतचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...