आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Girl Hansika Motwani And Many More South Indian Actresses Without Makeup Look

विना मेकअपसुद्धा ग्लॅमरस दिसते हंसिका, पाहा दाक्षिणात्य अॅक्ट्रेसेसचा Without Makeup लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'शाकालाका बूम बूम' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 26 वर्षे पू्र्ण केली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या या आघाडीच्या अभिनेत्रीचा 9 ऑगस्ट 1991 रोजी मुंबईत जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी रुपेरी पडद्यावर एन्ट्री  करणा-या हंसिकाने  मोजक्याच हिंदी सिनेमांत काम केले. परंतु ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीची आघाडीची अभिनेत्री आहे.
 
हंसिका बालपणापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. या प्रवासात तिच्या लूकमध्ये खूप बदल झाला. अगदी गोंडस दिसणारी हंसिका आता ग्लॅमरस दिसू लागली आहे. हंसिका ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन दोन्ही ठिकाणी ग्लॅमरस दिसते. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. परंतु तुम्ही हंसिकाचा कधी डी-ग्लॅम लूक पाहिला आहे का. कदाचित नाहीच.

बॉलिवूड असो अथवा टॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु मेकअपमुळे त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लागते. रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रींची स्किन ग्लोइंग दिसते. मात्र ही सर्व मेकअपची कमाल असते. दाक्षिणात्य अभिनेत्रींविषयीसुध्दा पडद्यावर अतिशय सुंदर दिसतात. मात्र ख-या आयुष्यात आणि विना मेकअप त्या अगदी सामान्य तरुणींप्रमाणे दिसतात. या अभिनेत्रींना विदाऊट मेकअप डी-ग्लॅम अवतारात पाहून तुम्ही अंदाजा बांधू शकता, की रिअल लाइफमध्ये त्या खूप साध्या दिसतात.

हंसिका मोटवानीच नव्हे काजल, त्रिशा कृष्णा, श्रुती हसन, नयतारा, तमन्ना, तापसी पन्नू, अनुष्का शेट्टी या अभिनेत्री रुपेरी पडद्यावर आपल्या सौंदर्याने सर्वांना भूरळ घालतात. मात्र विना मेकअप त्या कशा दिसतात हे पाहा पुढील स्लाइड्सवर...
 
बातम्या आणखी आहेत...