Home »Gossip» Hansika Motwani Birthday Special

B'day: हार्मोनल इंजेक्शन्समुळे वयापेक्षा मोठी दिसली होती हंसिका, MMS मुळे झाला होता वाद

दिव्य मराठी वेब टीम | Aug 09, 2017, 17:12 PM IST

बॉलिवूडची क्यूट आणि सेक्सी अॅक्ट्रेसपैकी एक हंसिका मोटवानी आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. 2003 साली 'शाका लाका बूम बूम' या हिंदी मालिकेतून हंसिकाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये ती बालकलाकाराच्या रुपात झळकली होती.
हंसिकाचा जन्म 8 ऑगस्ट 1991 रोजी बिझनेसम प्रदीप मोटवानी यांच्या घरी झाला. हंसिकाचे कुटुंबीय बौद्ध धर्माला फॉलो करतात. मुंबईतील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. तामिळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीतील हंसिका प्रसिद्ध नाव आहे. टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली तिला हृतिक रोशन स्टारर 'कोई मिल गया' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटात हंसिकाने बालकलाकाराची भूमिका निभावली होती.

पुढे वाचा, मोठे दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स घ्यायची हंसिका...

Next Article

Recommended