आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPCL: 63 वर्षांच्या झाल्या अरुणा ईराणी, आता इतका बदलला लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अरुणा ईराणी)
मुंबई- 300पेक्षा जास्त हिंदी सिनेमांत आणि अनेक टीव्ही शोमध्ये काम केलेल्या अभिनेत्री अरुणा ईराणी 63 वर्षांच्या झाल्या आहेत. अरुणा यांचा जन्म मुंबईमध्ये 3 मे 1952 रोजी झाला. त्यांना इंद्रकुमार आणि आदि ईराणी हे दोन भाऊ आहेत. दोघेही फिल्मी इंडस्ट्रीशी जुळलेले आहेत. 1961मध्ये 'गंगा जमुना'मध्ये अजराच्या पात्रासोबत अरुणाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्या केवळ 9 वर्षांच्या होत्या.
'थोडी रेशम लगता है', 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मै शायर तो नही' बॉलिवूड सिनेमांची ही गाणे आहेत, ज्यामुळे अरुणी ईराणी लोकप्रिय झाल्या. अरुणा यांनी 'जहा आरा' (1954), 'फर्ज' (1967), 'उपकार' (1967), 'आया सावन झूम के' (1969), 'कारवा' (1971)सारख्या सिनेमांत कामदेखील केले आहे. 'कारवा'मध्ये अरुणा यांच्या कामाची सर्वांनी प्रशंसादेखील केली. या सिनेमातील 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे' हे गाणे अरुणा यांच्या डान्समुळे लोकप्रिय झाले.
1972मध्ये अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बॉम्बे टू गोवा' सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमात महमूदसुध्दा होते. त्याकाळी अरुणा यांचे नाव महमूद यांच्याशी जुळले जात होते. त्यांनी महमूद यांच्यासोबत 'औलाद' (1968), 'हमजोली' (1970), 'नया जमाना' (1971), 'गरम मसाला' (1972) आणि 'दो फूल' (1973)सारखे सिनेमे केले. आपण महमूद यांच्याकडे आकर्षित होत असल्याचे जेव्हा अरुणा यांना जाणावले तेव्हा त्यांनी सर्व महमूद यांच्यासोबत काम करायचे सोडून सर्व लक्ष्य आपल्या करिअरवर दिले.
अरुणा यांनी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलेल्या नवोदित कलाकारांना खूप मदत केली. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लव्ह स्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तला सढळ हाताने मदत केली होती. परंतु त्यांचे दुर्दैव, की सर्व कलाकार सुपरस्टार बनले आणि त्या सहकलाकार म्हणून नावारुपास आल्या. त्यांनी दमदार अभिनयासाठी 'पेट प्यार और पाप' (1985) आणि 'बेटा' (1993) सिनेमासाठी फिल्मफेअर उत्कृष्ट सहकलाकार पुरस्कार पटकावला. 2012मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या करिअरदरम्यान अरुणा अनेक मराठी सिनेमांतसुध्दा झळकल्या आहेत. एवढेच नव्हे त्यांनी रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 2000मध्ये आलेल्या 'जमाना बदल गया'मधून छोट्या पडद्यावर अभिनयास सुरुवात केली. 'कहानी घर घर की' (2006-2007), 'झांसी की रानी' (2009-2011), 'देखा एक ख्वाब' (2011-2012), 'परिचय' (2011-2013), 'संस्कार धरोहर अपनो की' (2013-14)सारख्या अने टीव्ही मालिकांमध्ये काम केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अरुणा ईराणी यांच्या खासगी आयुष्यातील आणि सिनेमांतील निवडक छायाचित्रे...