आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... सिनेमा बघून या अॅक्ट्रेसने घेतली होती इमारतीवरुन उडी, जाणून घ्या काय घडले होते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री भावना मेनन हिने नुकताच आपला 30 वा वाढदिवस साजरा केला. 6 जून 1986 रोजी केरळ येथील त्रिशूर येथे तिचा जन्म झाला. सिनेमॅटोग्राफरच्या घरी जन्माला आलेल्या भावनाचे खरे नाव कार्तिका मेनन आहे. 11 वी शिकत असताना पहिल्यांदा तिला सिनेमाची ऑफर मिळाली.
वयाच्या 16 व्या वर्षी तिने नाम्मल या सिनेमातून डेब्यू केले होते. भावना बालपणी दाक्षिणात्य अभिनेत्री आमलावर खूप इम्प्रेस होती. तिचे सिनेमे बघून भावना आरशासमोर अभिनयाचा सराव करायची. एकदा तर एका सिनेमात आमलाला इमारतीवरुन उडी घेताना पाहून तिनेसुद्धा इमारतीवरुन उडी घेतली होती. त्यामुळे तिला बरीच दुखापत झाली होती. शिवाय हातसुद्धा फ्रॅक्चर झाला होता.
लवकरच मिळाले यश...
वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या भावनाने अल्पावधीत मल्याळम सिनेमांत आपले वेगळे स्था निर्माण केले. 'नाम्मल' या पहिल्याच सिनेमासाठी तिला अवॉर्डही मिळाला. त्यानंतर भावनाने कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या करिअरमध्ये तिने दोनदा केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड आणि एकदा फिल्मफेअर अवॉर्ड आपल्या नावी केला. याशिवाय बरेच पुरस्कार तिला मिळाले आहेत.
दक्षिणेच्या सर्वच अभिनेत्यांसोबत केले काम...
भावनाने दक्षिणेतील जवळजवळ सर्वच अभिनेत्यांसोबत काम केले आहेत. आता तिला बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

भावनाचे सिनेमे...
'बस कंडक्टर', 'किसान', 'चेस', 'दीपावली', 'कोडल नगर', 'छोटा मुंबई', 'आर्या', 'रामेश्वरम', 'हीरो', 'लॉलीपॉप', 'रॉबिनहुड', 'जॅकी', 'हॅप्पी हसबंड', 'विंटर', 'द मेट्रो', 'डॉक्टर लव', 'रोमियो', 'ओरु', 'टोपीवाला' यांसह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, भावनाची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...