आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Bet You've Never Seen Such Hot Pictures Of Huma Qureshi Before

B'day तीन भावांची लाडकी बहीण आहे हुमा, वडिलांची Saleem's नावाने आहे रेस्तरॉ चेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जुलै 1986 रोजी दिल्लीत एका मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला. हुमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारी हुमा लवकरच मराठी सिनेमात झळकणारे. उमेश कुलकर्णी दिग्दर्शित हायवे या सिनेमात झळकणारेय. त्यामुळे हुमाचे दर्शन लवकरच मराठी पडद्यावर घडेल.
हुमाचे खासगी आयुष्य...
हुमा मुळची दिल्लीची असून ती तेथेच लहानाची मोठी झाली आहे. तिचे वडील सलीम कुरैशी रेस्तरॉ मालिक असून त्यांची 'सलीम्स' (Saleem's) या नावाने रेस्तरॉ चेन आहे. तर तिची आई अमिना कुरैशी या हाऊसवाइफ आहेत. हुमाला तीन भाऊ असून त्यापैकी एकजण बॉलिवूड अभिनेता आहे. हुमाने दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून इतिहास या विषयात पदवी प्राप्त केली आहे.
मॉडेलिंग आणि रंगभूमीवरुन केली करिअरला सुरुवात..
हुमाने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीवरुन केली. तिने दिल्लीतील अॅक्ट 1 थिएटर ग्रुप नावाचे थिएटर जॉईन करुन काही नाटकांमध्ये अभिनय केला. याशिवाय तिने काही सामाजिक संस्थांसाठी डॉक्युमेंट्री फिल्ममेकर म्हणूनसुद्धा काम केले. त्यानंतर 2008मध्ये मित्रांच्या सांगण्यावरुन तिने मुंबई गाठली आणि येथे 'जंक्शन' या सिनेमासाठी ऑडीशन दिले. या सिनेमासाठी तिची निवडसुद्धा झाली. मात्र काही कारणास्तव हा सिनेमा पूर्ण झाला नाही. त्यानंतर हुमाने एका नामांकित कंपनीसाठी टीव्ही जाहिरातींचा दोन वर्षांचा करार साइन केला. आमिर खानसह सॅमसंग मोबाईल, शाहरुख खानसह नेरोलॅक, विटा मारली, सफोला ऑईल, पिअर्स सोप यांसारख्या जाहिरांतीमध्ये काम केले.
बॉलिवूडमध्ये अशी मिळाली पहिली संधी...
सॅमसंग मोबाईलची जाहिरात करत असताना दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची नजर हुमावर पडली. तिच्या अभिनय आणि लूक्समुळे ते प्रभावित झाले होते. त्यांनी तिला आपल्या गँग्स ऑफ वासेपूर या सिनेमात पहिली संधी दिली. गँग्स ऑफ वासेपूरच्या दुस-या भागतसुद्धा हुमा झळकली. या दोन्ही सिनेमांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या आणि अशाप्रकारे हुमासाठी बॉलिवूडचे दार उघडले. त्यानंतर तिचे लव शव ते चिकन खुराना, एक थी डायन, शॉर्ट्स (शॉर्ट फिल्म), दी डे, डेढ इश्किया हे सिनेमे मोठ्या पडद्यावर झळकले. आगामी 'बदलापूर' सिनेमात ती झळकणार आहे.
अर्जुन बावेजासह जुळले नाव...
फॅशन, बॉबी जासूस या सिनेमात झळकलेला अभिनेता अर्जुन बावेजासह हुमा रिलेशनशिपमध्ये होती. मात्र अल्पावधीतच या दोघांचे मार्ग विभक्त झालेत.
आज हुमाच्या 29 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिचे 29 ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा हुमाचा ग्लॅमरस आणि दिलखेचक अंदाज...