आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: ही अभिनेत्री आहे हेमामालिनींची भाची, लग्नानंतर ठोकला बॉलिवूडला रामराम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मधू हेमामालिनीसोबत)

बॉलिवूडचा एककाळ गाजवणारी अभिनेत्री मधू आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 26 मार्च 1972 रोजी मधूचा जन्म झाला. हिंदी सिनेसृष्टीसोबतच दक्षिणेतही मधूने भरपूर काम केले आहे. मल्याळम, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतील सिनेमांमध्ये मधूने अभिनय केला आहे.
1990मध्ये मल्याळम सिनेमाद्वारे मधूने आपल्या करिअरची सुरुवात केली. हिंदी सिनेसृष्टीत 1991मध्ये रिलीज झालेल्या अजय देवगण स्टारर 'फूल और कांटे'द्वारे तिने पदार्पण केले. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर 1992 मध्ये आलेल्या 'रोजा' हा सिनेमातील मधूच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
मधूने 'दिलजले', 'रावण राज', 'जल्लाद', 'जालिम', 'रोजा' 'ऐलान', 'प्रेम योग', 'जनता की अदालत', 'मोहिनी', 'दीया और तूफान' या हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 1999 मध्ये आनंद शाहसोबत लग्न थाटून मधूने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. तिला दोन मुली असून अमेया आणि किया ही तिच्या मुलींची नावे आहेत.
हेमामालिनी यांची भाची...
अभिनेत्री मधू ड्रीमगर्ल हेमामालिनी यांची भाची आहे. या नात्याने ईशा-अहाना आणि मधू बहिणी आहेत.
मधूच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची खासगी छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये ती आपल्या दोन्ही मुलींसोबत दिसतेय...