आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPCL: 43 वर्षांची झाली ममता कुलकर्णी, साध्वीच्या रुपात व्यतित करत आहे जीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[ममता कुलकर्णी]
नव्वदच्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत जन्मलेली ममता आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमाद्वारे ममताने अभिनयाचा श्रीगणेशा केला. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ममताला 'तिरंगा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. 1993 मध्ये रिलीज झालेला 'आशिक आवारा' हा सिनेमा ममताच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बोल्ट न्यू फेस अवॉर्डसुद्धा मिळाला.
ममताने आपल्या करिअरमध्ये 'भूकंप', 'अशांत', 'विष्णु विजय', 'बाजी', 'सबसे बड़ा खिलाड़ी', 'करण-अर्जुन', 'नसीब', 'चाइना गेट', 'छुपा रुस्तम', 'क्रांतिवीर', 'आंदोलन', 'किस्मत' यांसह अनेक सिनेमात काम केले आहे.
टॉपलेस होण्याचे दाखवले होते धाडस...
नव्वदच्या दशकातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या ममताने 1993मध्ये टॉपलेस होण्याचे धाडस दाखवले होते. तिचा टॉपलेस अंदाज स्टारडस्ट मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसला होता. तिच्या या फोटोशूटने खळबळ उडवली होती.
साध्वीच्या रुपात आली समोर...
ममताने 2002 नंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला आणि अज्ञातवासात निघून गेली. काही दिवसांपूर्वीच ती अध्यात्माकडे वळल्याचे उघड झाले. ममता कुलकर्णीने सन्‍यांस घेतला असून ती एक साध्‍वी झाली आहे. तिने तिच्‍या गुरुंवर एक पुस्‍तकही लिहिले. खरं तर तिने इस्‍लाम स्विकारल्‍याच्‍या बातम्यांची संख्‍या जास्‍त होती. तिने ड्रग माफिया विक्‍की गोस्‍वामीसोबत लग्‍न केल्‍याचीही बातमी पसरली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी ती प्रसारमाध्‍यमांसमोर आली होती. बॉलिवूडपासून अचानक दूर जाण्‍याच्‍या निर्णयाबाबत तिने सांगितले होते, 'काही जण जगाची कामे करण्‍यासाठी जन्‍म घेतात तर काही जण ईश्‍वराची. मी ईश्‍वराच्‍या कामांसाठी या जगात आले आहे.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ममता कुलकर्णीच्या बोल्ड अदा...