मुंबई : रॅपर हार्ड कौर जिथे असेल, तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही, तरच नवल. बुधवारी रात्री एका क्लबमध्ये दारुच्या नशेत हार्ड कौरने असे काही केले, ज्यामुळे बॉलिवूडची बेबीडॉल सनी लिओन चर्चेत आली आहे. हार्ड कौरच्या एका वक्तव्यामुळे सनी चर्चेत आली आहे. हार्ड कौरने जाहीरपणे सनी लिओनला शिवीगाळ केल्याचा प्रकार येथे घडला. या शिवागाळ प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘स्पॉटबॉय डॉट कॉम’च्या व्हिडिओनुसार, गायिका हार्ड कौर हिने सनी लिओनला शिवीगाळ केली आणि तेही कॅमेऱ्यांसमोर. हार्ड कौरने दिलेली शिवी व्हिडिओमधून स्पष्ट ऐकायला येत आहे. पुढील स्लाईडवर असलेल्या व्हिडिओत पाहा, हार्ड कौर काय म्हणाली सनीविषयी...