आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बजरंगी...'मध्ये मुकी असलेली 'मुन्नी' खासगी आयुष्यात आहे खूप बडबडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'बजरंगी भाईजान' सिनेमामध्ये मुक्या मुलीची भूमिका साकारणारी चिमुकली ख-या आयुष्यात मात्र खूप बोलकी आहे. 'बजरंगी...'मध्ये चाइल्ड आर्टिस्ट हर्षाली मल्होत्रा जशी सिनेमात दिसली आहे त्याउलट खासगी आयुष्यात आहे. हर्षालीच्या आईच्या सांगण्यानुसार, हर्षाली रिअल लाइफमध्ये खूप बडबडी आहे.
पत्रकारांसोबत बातचीतत करत असताना हर्षालीची आई काजल यांनी सांगितले, 'हर्षाली कधीच शांत बसत नाही. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी मला सांगितले, की आम्हाला चिंता होती की हर्षाली शांत कशी राहिल.'
हर्षाची आईने असेही सांगितले, 'सिनेमामध्ये काम केल्यानंतर हर्षालीमध्ये जराही फरक पडलेला नाहीये. ती जशी पूर्वी होती, तशीच आजही आहे. शूटिंग शेड्यूलचा हर्षालीवर काहीच फरक पडला नाही. एखाद्या लहान मुलासोबत शूटिंग करणे निर्मात्यांना आणि स्वत:च्या लहान मुलाला कठिण असते.'
हर्षालीची आई म्हणाली, 'जर एखादा मोठा आवाज झाला किंवा अॅक्शन झाली कर हर्षाली घाबरत होती. परंतु सलमान खान आणि कबीर खानने याकडे बारकाईन लक्ष देऊन तिची काळजी घेतली. ती इतर अॅक्टर्ससोबत खेळण्यात वेळ घालवत होती. त्यामुळे तिच्यावर या गोष्टींचा परिणाम झाला नाही.'
'बजरंगी भाईजान'मध्ये सलमान खान, करीना कपूरपेक्षा प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष हर्षाली वेधले. तिचा निरागस चेहराच न बोलता सर्वकाही सांगून जातो. हर्षालीने या सिनेमापूर्वी जाहिराती आणि काही मालिकांमध्येसुध्दा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हर्षालीचे काही फोटो...