आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, \'बजरंगी भाईजान\'मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ही चिमुकली आहे तरी कोण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बालकलाकार हर्षाली मल्होत्रा)
'बजरंगी भाईजान' या आगामी सिनेमात सुपरस्टार सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमानसोबत अभिनेत्री करीना कपूर खान स्क्रिन शेअर करत आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्सही मिळत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतेय ती एक लहान मुलगी. पाकिस्तानातून चुकीने भारतात दाखल झालेल्या मुलीची भूमिकेत ही चिमुकली दिसत आहे.
सलमानसोबत झळकणारी आणि क्यूट दिसणारी ही चिमुकली आहे तरी कोण ? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना. चला तर मग तुमची उत्सुकता जास्त ताणून न धरता आम्ही तुम्हाला या चिमुकलीविषयी सांगतो.
या क्यूट मुलीचे नाव आहे हर्षाली मल्होत्रा. 'बजरंगी भाईजान' हा हर्षालीचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. मात्र छोट्या पडद्यावरील आणि जाहिरातीच्या दुनियेतील हर्षाली प्रसिद्ध चेहरा आहे. छोट्या पडद्यावर आणि अनेक जाहिरातींमध्ये ही क्यूट मुलगी दिसली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणकोणत्या मालिका आणि जाहिरातींमध्ये हर्षालीचे दर्शन घडले आहे...