आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार मुलींमधून हर्षालीची निवड, जाणून घ्या \'बजरंगी...\'मधील \'मुन्नी\'विषयी सर्वकाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्यूट हर्षाली मल्होत्रा... - Divya Marathi
क्यूट हर्षाली मल्होत्रा...
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुपरस्टार सलमान खानच्या चाहत्यांसाठी तर हा सिनेमा ईदची ईदी ठरला आहे. सलमान आणि करीनाची केमिस्ट्री चांगली रंगली आहे. ब-याच दिवसांनी त्याचा एक चांगला सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. सलमानने भावनिक नायक चांगला वठवला आहे. नवाजुद्दीनने पुन्हा एकदा कमाल केली आहे. त्याच्या नैसर्गिक अभिनयाला दाद द्यावी तेवढी थोडीच.
या सर्व कलाकारांमध्ये सर्वाधिक लक्षात राहणारा चेहरा ठरला आहे एका चिमुकलीचा. पाकिस्तानातून आलेल्या एका मुक्या मुलीची शाहिदा उर्फ मुन्नीची भूमिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे. विशेष म्हणजे त्या चिमुरडीच्या तोंडी एकही डायलॉग नाही, मात्र तरीही सर्वांनाच तिने आकर्षित केलं आहे. पडद्यावरचा हा निरागस चेहरा कोण आहे? यापूर्वी कधी हा चेहरा पडद्यावर प्रेक्षकांना दिसला आहे का? याविषयीची नक्कीच उत्सुकता तुमच्या मनात निर्माण झाली असणार.
चला तर मग सलमानसोबत झळकणारी आणि क्यूट दिसणारी ही चिमुकली आहे तरी कोण? जाणून घ्या..
या क्यूट मुलीचे नाव आहे हर्षाली मल्होत्रा. तब्बल पाच हजार मुलींमधून हर्षालीची निवड या सिनेमासाठी झाली आहे. 'बजरंगी भाईजान' हा हर्षालीचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. मात्र छोट्या पडद्यावरील आणि जाहिरातीच्या दुनियेतील हर्षाली प्रसिद्ध चेहरा आहे. छोट्या पडद्यावर आणि अनेक जाहिरातींमध्ये ही क्यूट मुलगी दिसली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणकोणत्या मालिका आणि जाहिरातींमध्ये हर्षालीचे दर्शन घडले आहे...