Home »Gossip» Hate Story Fame Actress Paoli Dam New Wedding Photos

पाओलीचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी, बघा मेंदी, हळदीसोबत लग्नाचे New Photos

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 12:51 PM IST

मुंबई: 'हेट स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बंगाली अभिनेत्री पाओली दाम 5 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड अर्जुन देबसोबत विवाहबद्ध झाली. कोलकातामध्ये बंगाली पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मोजके पाहुणे आमंत्रित होते. पाओली आणि अर्जुन यांच्या लग्नाचे काही निवडक फोटोज सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. या फोटोजमध्ये रेड कलरच्या साडीत पाओली अतिशय सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे पाओलीने तिच्या लग्नाचा थांगपत्ता चाहत्यांना लागू दिला नाही. गुपचुप तिने लग्न थाटले. लग्नानंतरचा पहिला सेल्फी पाओलीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

हॉटेल बिझनेसमध्ये आहे पाओलीचे पती..
पाओलीचे पती अर्जुन देब हे मुळचे गुवाहाटीचे असून हॉटेल व्यावसायिक आहेत. गुवाहाटीमध्ये त्यांचे रेस्तराँ आहे. पाओली आणि अर्जुन यांचे हे लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. त्यानंतर भेटीचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात झाले आहे.


बघा, पाओलीच्या मेंदी, हळद आणि लग्नसोहळ्याचे नवीन Photos...

Next Article

Recommended