Home »Gossip» Hate Story Fame Actress Paoli Dam Wedding Album

Wedding Album : 'हेट स्टोरी' फेम पाओली दामने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप थाटले लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 16:40 PM IST


मुंबई: 'हेट स्टोरी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बंगाली अभिनेत्री पाओली दामने 5 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंडसोबत लग्न थाटले. वयाच्या 37 व्या वर्षी पाओली बॉयफ्रेंड अर्जुन देबसोबत बंगाली पद्धतीने विवाहबद्ध झाली. कोलकातामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला मोजके पाहुणे आमंत्रित होते. पाओली आणि अर्जुन यांच्या लग्नाचे काही निवडक फोटोज सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. या फोटोजमध्ये रेड कलरच्या साडीत पाओली अतिशय सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे पाओलीने तिच्या लग्नाचा थांगपत्ता चाहत्यांना लागू दिला नाही. गुपचुप तिने लग्न थाटले.


हॉटेल बिझनेसमध्ये आहे पाओलीचे पती..
पाओलीचे पती अर्जुन देब हे मुळचे गुवाहाटीचे असून हॉटेल व्यावसायिक आहेत. गुवाहाटीमध्ये त्यांचे रेस्तराँ आहे. पाओली आणि अर्जुन यांचे हे लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. त्यानंतर भेटीचे रुपांतर प्रेमात आणि आता लग्नात झाले आहे.


बॉलिवूडमध्ये झळकली...
पाओलीने 2004 साली आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली. बंगाली टेलिव्हिजनवर Tithir Atithi आणि Sonar Harin या गाजलेल्या मालिकांमध्ये पाओलीने अभिनय केला. तीन यारी कथा या चित्रपटातून पाओलीने डेब्यू केले होते. या चित्रपटाचे 2004 मध्ये चित्रीकरण सुरु झाले होते, पण चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला. पाओलीने अनेक गाजलेल्या बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. बोल्ड अभिनेत्री म्हणून पाओलीला बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. 2012 मध्ये तिने 'हेट स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने बरेच बोल्ड सीन्स दिले होते. त्यानंतर ती अंकुर अरोरा मर्डर केस, गँग ऑफ घोस्ट, यारा सिली सिली या चित्रपटांमध्ये झळकली.


बघा, पाओली दामचा वेडिंग अल्बम...

Next Article

Recommended