आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्सनंतर आता रणबीरला जडले दारुचे व्यसन, या व्यसनांमुळे उध्वस्त झाले या 8 स्टार्सचे करिअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच एका मुलाखतीत आपल्याला दारुचे व्यसन जडले असल्याची कबुली अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे. अनेकदा रणबीर ड्रिंक आणि स्मोकिंग करताना आढळला आहे. आपल्या या व्यसनाची माहिती रणबीरने व्होग मॅगझिनला दिली. मुलाखतीत तो म्हणाला, "सिनेसृष्टीत असल्याने मला या व्यसनापासून दूर जाणे भाग आहे. कारण दारुमुळे उद्धवस्त झालेली कुटुंब मी जवळून पाहिली आहे. मला दारुचे व्यसन जडल्याचे मी मान्य करतो. काम आणि शूटिंगच्या वेळी मी दारु पित नाही. मात्र जेव्हा मी शूटिंग करत नाही..."

शालेय दिवसांत ड्रग्स घ्यायचा रणबीर...
2011 मध्ये एका मुलाखतीत रणबीरने खुलासा केला होता, की रॉकस्टार सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याने ड्रग्स घेतले होते. तो म्हणाला होता, या सिनेमाच्या एका सीनच्या शूटिंगदरम्यान मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे मी ड्रग्स घेतले आणि नंतर शूटिंग पूर्ण केली. याच मुलाखतीत रणबीरने उघड केले होते, की शालेय दिवसांत तो ड्रग्स घ्यायचा आणि नंतर ती सवय बनली होती. मात्र आता रणबीरचे ड्रग्सचे व्यसन सुटले आहे.

ड्रग्स आणि दारुच्या व्यसनांमुळे उद्धवस्त झाले स्टार्सचे करिअर...
दीर्घ काळापासून हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या रणबीरला त्याला दारुचे व्यसन जुळल्याचे उमगले आहे. यावर तो ताबा मिळवून करिअरकडे लक्ष देईल, अशी आशा बाळगायला हवी. रणबीरला वगळता. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे या व्यसनांमुळे करिअर उद्धवस्त झाले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी, ज्यांचे करिअर दारू आणि ड्रग्सने उध्वस्त झाले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...