आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Have A Look At Cute Photos Of Newbie Athiya Shetty

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालपणी अशी दिसायची सुनील शेट्टीची मुलगी, आता बनली 'HERO'ची अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांसोबत अथिया शेट्टी - Divya Marathi
वडिलांसोबत अथिया शेट्टी
मुंबईः अभिनेता सुनील शेट्टीची 22 वर्षीय मुलगी अथिया शेट्टीने सलमान खान प्रॉडक्शनच्या 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. शुक्रवारी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला. या सिनेमात अथियाचा लीड हीरो आदित्या पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली आहे.
बॉलिवूड घराण्याशी संबंध असलेल्या अथियाला बालपणापासूनच सिनेमांची आवड आहे. आपल्या आवडीचे प्रोफेशन निवडण्यासाठी अथियाला तिचे वडील सुनील शेट्टी, आई माना शेट्टी आणि भाऊ अहान शेट्टी यांनी मदत केली.
बालपणापासूनच अभिनयाची आवड
तीन वर्षांची असल्यापासूनच अथियाला अभिनयाची आवड आहे. बालपणी आरशासमोर उभी राहून ती अॅक्टिंग आणि डान्स करायची. शालेय जीवनात असताना ती रंगभूमीवर काम करु लागली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अथियाने अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून 'फिल्मेकिंग अँड लिबरल आर्ट्स' हा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. वयाच्या 18 व्या वर्षी हा कोर्स पूर्ण करुन अथिया मुंबईत परतली. येथे तिने अॅक्टिंग, एडिटिंग आणि डायरेक्शनचे धडे गिरवले.
लांबचा पल्ला गाठणार...
एका मुलाखतीत अथियाने सांगितले, मला बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. अभिनयाविषयी मी खूप इमोशनल आहे. या इंडस्ट्रीत मी लांबचा पल्ला गाठेल, अशी मला आशा आहे.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर आहे अॅक्टिव...
बॉलिवूडची ही नवोदित अभिनेत्री सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच छायाचित्रे अपलोड केली आहेत. यामध्ये तिच्या बालपणीच्याही छायाचित्रांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अथियाची बालपणीची निवडक छायाचित्रे...