आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: कधीकाळी फाटकी जीन्स घालायचा सलमान, चाहत्यांनी बनवला ट्रेंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 13 वर्षे जूने हिट अँड रन प्रकणात सलमान खानला बुधवारी (6 मे) पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, हायकोर्टाने त्याला दोन दिवसांचा जामीन दिला आहे. आता शुक्रवारी (8 मे) त्याच्या जामीनावर केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे. तसे पाहता सलमानच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांना ठाऊक आहे. परंतु त्याच्या खासगी आयुष्याविषयी असे अनेक फॅक्ट्स आहेत, ज्याविषयी कदाचितच कुणाला माहिती असेल. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज सलमानच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत, ज्या गोष्टी एका न्यूज चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत समोर आल्या होत्या.
मजबूरीत परिधान करायचा फाटकी जीन्स-
सलमान खानला फाटलेल्या जीन्सचा ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखले जाते. त्याच्या सांगण्यानुसार, तो मजबूरीमध्ये फाटलेली जीन्स परिधान करायचा, परंतु लोकांना त्याला ट्रेंड केले. याविषयी त्याने एक किस्सादेखील सांगितला होता. सिंधीया शाळेत शिक्षा चालू असताना त्याच्या आईचा धाकटा भाऊ, त्यांना तो टायगर अंकल म्हणायचा. त्यांनी जर्मनीवरून एक जीन्स पाठवली होती. ती जीन्स त्याने कॉलेजमध्ये असेपर्यंत परिधान केली. नंतर जीन्स खराब झाली आणि फाटली. तरीदेखील सलमान फाटलेली जीन्स परिधान करून कॉलेजला जात होता. त्यावेळी सलमानकडे केवळ दोन किंवा तीनच जीन्स होत्या. म्हणून मजबूरीमध्ये त्याने ती फाटलेली जीन्स परिधान केली होती. मात्र लोकांनी ती फॅशन वाटली आणि त्यांनी ट्रेंड म्हणून वापरली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सलमानच्या खासगी आयुष्यातील खास गोष्टी...