आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भाईजान' एकदा-दोनदा नव्हे तब्बल 10 वेळा पडला प्रेमात, मात्र लग्न करायलाच विसरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'भाईजान' सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सुल्तान’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर बुधवारी रिलीज झाला आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी होता. छोट्या पडद्यावरील जवळजवळ सर्वच शोमध्ये तो प्रमोशन करताना दिसला. अलीकडेच ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह ऑन कलर्स’ या शोमध्ये गेला होता. तेव्हा होस्ट भारतीने सलमानची चांगलीच खेचली. भारतीने भाईजानला विचारले की,‘ तुमच्या आयुष्यात असे कोणी आहे का की तुम्ही तिच्यासाठी सगळं काही सोडून जाऊ शकतो?
नेहमीप्रमाणे भाईने आपल्या फनी स्टाईलमध्ये त्याचे उत्तर दिले. तो म्हणाला,‘ येस, ऐसा कोई है. पर वो ‘है’ नही ‘शी’ है.’ वेल, आता भाईच्या आयुष्यातील ‘स्पेशल ती’ कोण हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. बरोबर सलमानची ही नवीन मैत्रीण आहे लुलिया वंतूर.
अलीकडच्या काळात लुलिया आणि सलमान एकत्र सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसत आहेत. सलमान यावर्षाच्या अखेरपर्यंत लुलिया वंतूरसोबत विवाहबद्ध होणार असल्याची बातमी आहे. इंडस्ट्रीशी निगडीत सूत्रांवर विश्वास ठेवला असता, सलमानने लग्नाचा निर्णय घेतला असून यावर्षाच्या अखेरपर्यंत लुलियाला तो आपली पत्नी बनवणार आहे. चला जाणून घेऊयात सलमानच्या नवीन गर्लफ्रेंडविषयी...
विवाहित आहे लुलिया
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर रोमानियाची रहिवाशी असून मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. लुलिया विवाहित आहे. रोमच्या मारियस मोगासोबत तिचे लग्न झाले आहे. मारियस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. यूरोपमध्ये तो सध्या वास्तव्याला आहे. लुलिया आणि मारियसचे लग्न 7 ऑगस्ट 2012 रोजी झाले होते. मात्र आता हे दोघेही विभक्त झाले आहेत.
सिनेमांपेक्षा अफेअरमुळे चर्चेत असतो सलमान...
खरं तर सलमान आपल्या दबंगगिरीसाठी ओळखला जातो. मात्र सोबतच तो आपल्या गर्लफ्रेंड्समुळेही बराच चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या. मात्र प्रेमात तो नेहमी अपयशीच ठरला. संगीता बिजलानीपासून ते ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, जरी खान, सोमी अलीपर्यंत अनेक जणींसोबत त्याचे नाव जुळले. यापैकी अनेकींनी त्याच्यावर मारहाणीचा आरोप लावला आहे. काहींनी स्वतःहून त्याच्या आयुष्यातून काढता पाय घेतला, तर काहीजणींपासून सलमान स्वतः वेगळा झाला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सलमानच्या आयुष्यात आलेल्या तरुणींविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...