आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3890 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे शाहरुख खान, या कारणामुळे आला आहे चर्चेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या अलिबाग स्थित मॅन्शनमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या अलिबाग येथील अलिशान व्हिला वादात सापडला आहे. अनेक नियमांचा भंग करून हा बंगला बांधल्याचा आरोप होत आहे. शाहरुखने बनावट कागदपत्रे तयार करून या बंगल्याची बांधणी केल्याचा आरोप असून जमिन खरेदी करण्यासाठी कंपनी स्थापन केल्याचाही आरोप आहे. या बंगाल्याच्या केवळ जमिन खरेदीसाठीच शाहरुखने 8 कोटी 45 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची चर्चा आहे. एका अहवालानुसार शाहरुखच्या या अलिशान व्हिल्यावर शंका उपस्थित करण्यात येत आहे. अलिबाग येथील शेतजमीन खरेदीसाठी शाहरुखने बनावट कंपनी स्थापन केली. त्यांनतर त्या कंपनीच्या नावे कर्ज काढले. या ठिकाणी अलिशान व्हिला बांधताना त्याने समुद्र किनाऱ्यावरील बांधकाम नियमांचे उल्लंघन केले असल्याचेही म्हटले जात आहे. याप्रकरणी शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  


3890 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे शाहरुख खान 
शाहरुख 3890 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. विविध ब्रॅण्ड एन्डॉर्समेंटसाठी तो 3.5 कोटी रुपये मानधन घेत असतो. 24 हून अधिक ब्रॅण्ड्स तो एन्डॉर्स करतो.


पुढे वाचा, शाहरुखच्या कार कलेक्शनपासून ते त्याच्या आलिशान बंगल्यांसह इतर प्रॉपर्टी आणि आवडीनिवडींविषयी... 

बातम्या आणखी आहेत...