आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hazel Keech Starer "Aa Ante Amalapuram" Video Song Goes Viral

क्रिकेटपटू युवीच्या भावी पत्नीचा हॉट Video वायरल, जाणून घ्या कोण आहे ही अॅक्ट्रेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री हेजल कीच, इनसेटमध्ये युवराज सिंग - Divya Marathi
अभिनेत्री हेजल कीच, इनसेटमध्ये युवराज सिंग
बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरानंतर आणखी एक अभिनेत्री क्रिकेटपटूसोबत विवाहबद्ध होणार असल्याची बातमी आहे. अलीकडेच गीता बसरा क्रिकेटपटू हरभजन सिंगसोबत लग्नगाठीत अडकली. आता अभिनेत्री हेजल कीच क्रिकेट विश्वातील मोस्ट एलिजिबल बॅचलर असलेल्या युवराज सिंगसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
गेल्या काही महिन्यांपासून हेजल आणि युवराज रिलेशनशिपमध्ये असून पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करणार आहे. अलीकडेच युवराज आणि हेजल यांना लंडन एअरपोर्टवर एकत्र बघितले गेले होते. अद्याप हेजल किंवा युवराजकडून लग्नाविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कोण आहे हेजल कीच?
28 वर्षीय हेजल कीच ही एक ब्रिटिश अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे. 1987 साली इंग्लंडमध्ये तिचा जन्म झाला. सुपरस्टार सलमान खान स्टारर 'बॉडीगार्ड' या सिनेमात ती झळकली होती. याशिवाय 'मॅक्सिमम' या सिनेमातील 'आ आंटे अमलापुरम' या हॉट आयटम नंबरसाठीही तिला ओळखले जाते. 'बिग बॉस'च्या सातव्या पर्वात हेजल सहभागी झाली होती. मात्र कमी वोट मिळाल्याने पहिल्याच आठवड्यातून एलिमिनेट झाली होती.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, युवराजसोबत लग्नाची बातमी आल्यानंतर सोशल मीडियावर अचानक व्हायरल झालेला हेजलचा हा खास व्हिडिओ.. सोबतच पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हेजलचा हॉट अंदाज...