आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Helen Birthday : Helen Turned 79 Today, Helen Unknown Facts And Relationship With Salman Khan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधीकाळी हेलनचा चेहराही पाहात नव्हते सलमान आणि खान परिवार, असा घडला बदल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोनिका... ओ माय डार्लिंग या गाण्याचे बोलही जरी कानावर आले तरी डोळ्यांसमोर हेलन येते. 50 आणि 60 च्या दशकातील हिंदी सिनेमांवर राज्य करणाऱ्या हेलनचा आज (21 नोव्हेंबर) 79वा वाढदिवस आहे. हेलन या हिंदी सिनेमाच्या कॅबरे क्विन राहिल्या आहेत. हेलन यांनी त्यांच्या अॅक्टिंगने फक्त दर्शकांचे मनोरंजन केले नाही तर, प्रसिद्ध लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही आपले दिवाने केले होते. फक्त दिवानेच केले नव्हते तर असे वेड लावले होते की सलीम खान विवाहित असतानाही त्यांनी हेलनसोबत लग्न केले होते. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे, की सलीम खान आणि हेलनच्या लग्नाचा त्यांच्या एकाही मुलाला (सलमान, अरबाज आणि सोहेल) आनंद झालेला नव्हता. 

 

सलीम खानने 5 वर्षे सुशीला चरक यांना डेट केले होते, त्यानंतर 1964 मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर सुशीला चरक यांनी स्वतःचे नाव बदलून सलमा खान केले होते. सलीम आणि सलमा यांना तीन मुले झाली. सलमान, अरबाज आणि सोहल. त्यानंतर सलीम खान हेलनच्या प्रेमात पडले. या दोघांनी 1980 मध्ये लग्न केले होते. 

सलीम खान यांच्या लग्नाने खान परिवारात अनेकजण नाराज होते. सलमानसह तिन्ही भावडांचा या लग्नाला विरोध होता. सलमा खान या लग्नाने दुःखी होत्या. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला होता. त्या म्हणाल्या होत्या, या लग्नाने मी फार डिप्रेस्ड आणि डिस्टर्ब होते. सलमान, अरबाज आणि सोहेल हे तिघेही हेलनसोबत बोलत देखील नव्हते. 

 

काळा एवढे गुणकारी औषध दुसरे नाही... 
सलीम खान यांनीही एका मुलाखतीत सांगितले होते, की आमचे तिन्ही मुलं त्यांच्या आईकडून (सलमा खान) होते. आईचा विरोध असल्याने सहाजीकच मुलंही विरोध करत होते. मात्र असे म्हटले जाते, की 'काळा एवढे दुसरे कोणतेही गुणकारी औषध नाही'. हळु-हळु सर्वांना कळत गेले की ते हेलनला जेवढे वाईट समजत होते तसे तिच्यात काहीच नाही. ती सर्वांची काळजी घेते, सर्वांसोबत चांगली वागत असल्याचे त्यांनी पाहिले. सलमालाही जाणवले. 

 

जेव्हा सलमासह तिन्ही मुलं हेलनसोबत बोलायला लागले, तिच्यासोबत प्रेमाने वागायला लागले, तेव्हा संपुर्ण कुटुंब एक झाले. सर्व कार्यक्रम आणि फंक्श्न एकत्र येऊन साजरे करु लागले होते. अशा काही घटना घडल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण खान परिवार हेलनसाठी काहीही करण्यास तयार होत असे. हेलन तर सलीम खानवर तेव्हापासूनच फिदा होती, जेव्हा त्यांच्या हालाकीच्या आर्थिक परिस्थितीत सलीम यांनी तिला मदत केली होती. 

 

आज सलमान खान याच्यासाठी जेवढ्या सलमा खान आहेत तेच स्थान हेलन यांच्यासाठी त्याच्या मनात आहे. सलमा खान यांच्यासाठी तो जर एखादी वस्तू घेऊन येत असेल तर तशीच वस्तू तो हेलनसाठीही आणत असतो. तिघा भावांसाठी हेलन आता तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत जेवढी त्यांची आई सलमा आहे. 

बातम्या आणखी आहेत...