आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिनेच टिकले होते मिथून दांचे पहिले लग्न, योगिता बालीसोबत थाटला दुसरा संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली पत्नी हेलेना आणि दुसरी पत्नी योगिता बालीसोबत मिथून चक्रवर्ती - Divya Marathi
पहिली पत्नी हेलेना आणि दुसरी पत्नी योगिता बालीसोबत मिथून चक्रवर्ती
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे डिस्को डान्सर अर्थातच अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी वयाची 67 वर्षे पूर्ण केली आहेत. मिथून दा या नावाने प्रसिद्ध असलेले मिथून चक्रवर्ती पत्नी योगिता बाली, मुले महाक्षय, रिमोह आणि नमाशी चक्रवर्ती आणि मुलगी दिशानी चक्रवर्ती यांच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहेत. पण मिथून दांच्या आयुष्यात आलेली योगिता बाली एकमेव स्त्री नाहीये. योगिता बाली ही त्यांची दुसरी पत्नी आहे. योगितापूर्वी मिथून दा दोनदा प्रेमात पडले होते. त्यापैकी एकीशी त्यांनी लग्नदेखील केले. पण दुर्दैवाने लग्न फार काळ टिकू शकले नाही. 
 
जाणून घेऊयात, योगिता बालीपूर्वी मिथून दांच्या आयुष्यात आलेल्या दोघीजणी होत्या तरी कोण...    
 
अभिनेत्री सारिकासोबत होते मिथून दांचे अफेअर...
मिथून दांनी 1976 साली 'मृगया' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 70च्या दशकात अभिनेत्री सारिकासोबत त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. त्याकाळात सारिकासोबत त्यांचे सूत जुळल्याची चर्चा सुरु झाली होती. हे दोघे त्यांच्या नात्याविषयी एवढे गंभीर होते, की दोघे लग्न करणार असल्याची चर्चा फिल्मी वर्तुळात रंगू लागली होती. पण अचानकच दोघांचे ब्रेकअप झाल्याचे उघड झाले. सारिकासोबत ब्रेकअपच्या दुःखातून सावत असताना त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली ती अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या हेलेना लूकची.  
 
पुढे वाचा, कसे जवळ आले होते हेलेना आणि मिथून चक्रवर्ती... सोबतच बघा दोघांच्या लग्नाचे फोटोज...