आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमा मालिनींमुळे सेटवरच घालवावी लागली होती शाहरुख गौरीला लग्नानंतरची पहिली रात्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खान आणि गौरी 25 ऑक्टोबरला लग्नाचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 25 ऑक्टोबर 1991 ला हिंदु पद्धतीनुसार दोघांनी लग्न केले होते. पण शाहरुख आणि गौरीची लग्नानंतरची पहिली रात्र सेटवरच गेली होती, हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे हे सर्व घडले होते, हेमा मालिनी यांच्या एका फोन कॉलमुळे. असे म्हटले जाते की, शाहरुख आणि गौरीचे जेव्हा लग्न झाले होते, तेव्हा हेमा मालिनी यांनी शाहरुखला फोन करून म्हटले होते की, त्याची इच्छा असेल तर तो शुटिंगसाठी येऊ शकतो. शाहरुख हे ऐकूण खुश होता की, हेमा मालिनींना भेटणे हा गौरीसाठीही खास क्षण असेल. गौरीही त्यासाठी एक्साइटेड होती. 

हेमा यांचा वाट पाहण्यात संपली रात्र.. 
- शाहरुख गौरीला घेऊन स्टुडियोत आला. पण हेमा मालिनी दिसल्या नाहीत. असिस्टंट डायरेक्टर्स होते. ते म्हणाले, त्या थोड्या वेळात येतील. शाहरुख आणि गौरीला एका स्टुडिओत बसून हेमा मालिनी यांची वाट पाहत होते. 
- रात्री सुमारे 11 वाजता शाहरुख गौरीला मेकअप रूममध्येच सोडून शुटिंगसाठी गेला. सुमारे दोन वाजेपर्यंत शुटिंग सुरू होते. पण हेमा मालिनी आल्या नव्हत्या. 
- थकलेला शाहरुख मेकअप रूममध्ये परत आला तेव्हा त्याने साडी आणि दागिणींच्या ओझ्याने थकून गौरी एका लोखंडी खुर्चीवरच झोपलेली त्याला दिसली. शाहरुखला तेव्हा फार वाईट वाटले होते. पण तो त्याचा स्ट्रगलचा काळ होता, त्यामुळे तो काही बोलूही शकत नव्हता. 

या चित्रपटाचे शुटिंग करत होता.. 
- शाहरुख खानला हेमा मालिनी यांनी त्यांच्या दिग्दर्शानत आणि निर्मितीत तयार होणार्या 'दिल आशना है' साठी साइन केले होते. लग्नाच्या रात्री याच चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. 

आर्यनच्या जन्मापूर्वी झाले गौरीचे मिसकॅरेज.. वाचा पुढील स्लाइड्सवर.. 

 
बातम्या आणखी आहेत...