आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता या 5 CELEBS नी थाटला होता दुसरा संसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची अतिशय सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री हेमामालिनी आणि बॉलिवूडचे 'हीमॅन' धर्मेंद्र लवकरच आजीआजोबा होणार आहेत. त्यांची मुलगी ईशा देओल ही प्रेग्नेंट असून लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 29 जून 2012 रोजी ईशाचे बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईतील इस्कॉन मंदिरात मोठ्या थाटात झाले होते. लग्नानंतर ईशाने सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून ती वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे. ईशाची आई हेमामालिनी यांच्याविषयी बोलायचे झाल्यास तीन दशकांहून अधिकच्या आपल्या यशस्वी करिअरमध्ये हेमा यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. प्रोफेशन असो, वा पर्सनल लाइफ हेमा नेहमी चर्चेत राहिल्या. विशेषतः धर्मेंद्र यांच्यासोबतचे नाते जास्त चर्चेत राहिले.
 
लग्नामुळे निर्माण झाला होता गोंधळ
- हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लग्न बॉलिवूडचे सर्वाधिक चर्चेतील लग्नांपैकी एक आहे. पहिल्या मुलीचे लग्न झाल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा यांच्यासोबत लग्न केले होते. त्यावेळी सनी देओल सिनेमात येण्याची तयारी करत होता. दोघांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. 
- विशेष म्हणजे, सनी वडिलांच्या या निर्णयाने नाराज होता. प्रेम आणि कुटुंबाच्या मध्ये तडजोड करून धर्मेंद्र यांनी धर्म बदलून 1980मध्ये हेमा यांच्याशी लग्न केले. 
- धर्मेंद्र यांची पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. पहिली पत्नी असूनदेखील धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा यांच्याशी लग्न केले.
- हेमा आणि धर्मंद्र यांच्याशिवाय बॉलिवूडमध्ये आणखी काही असे सेलेब्स आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरा संसार थाटला. divyamarathi.com या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच काही सेलेब्सची माहिती देत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा काही स्टार्सविषयी ज्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले...
बातम्या आणखी आहेत...