एन्टरटेन्मेंट डेस्कः 2016 या वर्षात बॉलिवूडमधून प्रेक्षकांना अनेक सरप्राईजेस मिळणार आहेत. काही स्टार किड्ससह नवीन चेहरे मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन, दिलीप कुमार-सायरा बानोंची जवळची नातेवाईक सायशा सहगल, जेपी दत्तांची मुलगी निधी यावर्षी सिल्व्हर स्क्रिनवर दमदार एन्ट्री करणार आहेत.
विशेष म्हणजे मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर यांची एकुलती एक लेक श्रिया पिळगावकरसुद्धा यावर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. एकुण तब्बल 17 नवीन चेहरे प्रेक्षकांना यावर्षी मोठ्या पडद्यावर सिल्व्हर स्क्रिनवर बघायला मिळणार आहेत.
कोण आहेत हे नवोदित याचाच आढावा आम्ही घेतला आहे. चला तर मग यावर्षी बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या नवोदितांना भेटण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...