आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is How Sunny Leone Was Shot Intimate Scenes For One Night Stand

जाणून घ्या, सनी लिओनने कसे शूट केले \'वन नाइट स्टँड\'चे Intimate Scenes

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'वन नाइट स्टँड\'च्या एका सीनमध्ये तनुज विरवानी आणि सनी लिओन - Divya Marathi
\'वन नाइट स्टँड\'च्या एका सीनमध्ये तनुज विरवानी आणि सनी लिओन

मुंबईः दिग्दर्शिका जॅस्मिन डिसुजाचा 'वन नाइट स्टँड' हा आगामी सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात सनी लिओन आणि तनुज विरवानी यांच्यावर चित्रीत झालेले अनेक इंटिमेट सीन्स बघायला मिळणार आहेत. divyamarathi.com सोबत बोलताना दिग्दर्शिका जॅस्मिन यांनी सनी आणि तनुज यांच्यावर हे इंटिमेट सीन्स कसे शूट करण्यात आले, याची माहिती दिली. शिवाय सिनेमाच्या शूटिंगशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या.

मुंबई, पुणे आणि फुकेटमध्ये झाले शूटिंग
जॅस्मिन यांनी सांगितल्याप्रमाणे, 'वन नाइट स्टँड' या सिनेमाचे शूटिंग मुलूंड (मुंबई) स्थित रिचर्डसन आणि क्रुद्दास प्रॉपर्टी येथे झाले. याशिवाय काही सीन्स पुण्यात चित्रीत करण्यात आले. फुकेटमध्ये खाओ बीच आणि हॉटेल पुलमन येथेही सिनेमाचे शूटिंग झाले.

समुद्रात बुडताना थोडक्यात बचावली सनी
'वन नाइट स्टँड'च्या शूटिंगवेळी सनीसोबत एक दुर्घटना घडली होती. झाले असे, की रोमँटिक गाण्याच्या शूटिंगवेळी सनी तिचा को-अॅक्टर तनुजसोबत बीचवर उभी होती. त्यादिवशी वातावरण फारसे चांगले नव्हते. समुद्र खवळलेला होता आणि उंच लाटा येत होत्या. या परिस्थितीतसुद्धा दोन्ही अॅक्टर शूटिंगसाठी रेडी झाले. शॉट देत असताना सनी आणि तनुज समुद्राच्या लाटांसोबत वाहून जात होते. मात्र सिनेमाच्या संपूर्ण टीमने सावधगिरी बाळगत दोघांनाही लगेचच पाण्याबाहेर काढले. मात्र एक उंच लाट पुन्हा दोघांना आत घेऊ गेली. तेव्हा तेथे हजर असलेल्या एका रेक्स्यू टीमने दोघांना पाण्याबाहेर काढले.

कसे शूट झाले इंटिमेट सीन्स
जॅस्मिन यांनी सांगितले, की सनीने यापूर्वीही इंटिमेट सीन्स दिले आहेत. मात्र तनुजसाठी हा अनुभव नवीन होता. त्यामुळे सनी आणि तनुज एकत्र बसून पुढील सीन्स कसे शूट करायचे यावर चर्चा करत असे. याच कारणामुळे दोघेही प्रत्येक सीन आत्मविश्वासाने करु शकले.
सनीचा गमतीशीर अंदाज...
जॅस्मिन यांनी सांगितले, की सेटवर सनीचा गमतीशीर अंदाज आम्हाला अनेकदा बघायला मिळाला. जेव्हा तनुजचा सिंगल शॉट सुरु असायचा तेव्हा सनी कॅमे-यामागून चेह-यावर विचित्र हावभाव आणून तनुजला हसवायची. इतकेच नाही तर एका शॉटमध्ये तनुजला शर्टलेस व्हायचे होते, त्यामुळे तो डाएटवर होता. तनुजचा चिडवण्यासाठी ती मुद्दामून सेटवर डोनट्सचे पाकिट आणायची. तनुजसमोर इतर मेंबर्ससोबत ती ते खायची.
सनी आणि रतीचे इक्वेशन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तनुजची आई रती अग्निहोत्री यांना तनुजचे एका पोर्न अभिनेत्रीसोबत काम करणे आवडले नाही. असे काहीही घडले नसल्याचे जॅस्मिन यांनी यावेळी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "अशा बातम्या कुठून आल्या मला माहित नाही. मला आठवतंय, की पहिल्या शेड्युलला रती स्वतः सेटवर आल्या आणि त्यांनी सनीची भेट घेतली. दोघींनी बराच काळ एकत्र घालवला होता. दोघीही एकमेकींसोबत फ्रेंडली दिसल्या होत्या.''

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाचे निवडक ऑन लोकेशन फोटोज...