मुंबईः निखिल आडवाणी दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्स निर्मित 'हीरो' हा सिनेमा मुव्ही स्क्रिन्सवर दाखल झाला आहे. या सिनेमाद्वारे बॉलिवूडच्या दोन स्टार किड्सनी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली आहे. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी या दोघेही आपल्या पहिल्या सिनेमाविषयी थोडे नर्व्हस दिसत आहेत.
1983 मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई दिग्दर्शित 'हीरो' या सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात सूरज पांचोलीने भरपूर अॅक्शन सीन्स दिले आहे. त्याने यासाठी आपल्या बॉडीवरसुद्धा भरपूर मेहनत घेतली आहे. या सिनेमाच्या शूटिंग सीन्सचा एक व्हिडिओ यूट्युबवर अपलोड झाला आहे. यामध्ये सूरजने कठीण अॅक्शन सीन्स कसे केले, याविषयी सांगण्यात आले आहे.
सिनेमाचे हेच बिहाइंड द सीन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईडमध्ये तुम्हाला या अॅक्शन सीन्सचा व्हिडिओ आणि त्यापुढील स्लाईड्समध्ये शूटिंगदरम्यानची छायाचित्रे बघता येतील...