आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्जुनसोबतच्या नात्यावर पहिल्यांदा बोलली सलमानची वहिनी, जाणून घ्या काय म्हणाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत असताना काही दिवसांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यावेळी मलायका आणि अरबाजमधल्या वादाला अर्जुन कपूर जबाबदार असल्याची चर्चा होती. आजही मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये असलेल्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. या चर्चा शमत नसल्याचे बघून मलायकाने सरतेशेवटी तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामागचे सत्य उघड केले आहे. मलायका म्हणाली, ‘अर्जुन माझा खुपच चांगला मित्र आहे. पण, लोकांनीच याचा वेगळा अर्थ काढला आहे जो चुकीचा आहे.’
मलायकाच्या घरी आहे अर्जुनचे येणे-जाणे
काही दिवसांपूर्वी अर्जुनला मलायकाच्या घराबाहेरही पाहिले गेले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन अनेकदा बऱ्याच वेळासाठी मलायकाच्या घरी येत असतो. मलायका आणि अरबाज खानने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून ती आणि तिचा मुलगा ‘टस्कनी हाईट्स’ येथे राहात आहेत.

एकेकाळी सलमानच्या धाकट्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये होता अर्जुन....
एकेकाळी अर्जुन कपूर सलमानची धाकटी बहीण अर्पिता खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतरही अर्जुनचे सलमानसोबतचे नाते चांगले होते. पण मलायकासोबत त्याचे नाव जुळल्यापासून तो क्वचितच सलमानसोबत दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान अर्जुनवर नाराज आहे.

अरबाज-मलायकाने दाखल केला घटस्फोटासाठीचा अर्ज...
गेला काही काळ अरबाज आणि मलायकाच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यानंतर आता पुन्हा हे दोघंही त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मुलांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण तसे काहीही झालेले नाही. या दोघांनीही याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचे ठरवले आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मलायकाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या 18 वर्षांचा सुखी संसार संपुष्टात येत आहे.
पुढे वाचा, सलीम खान यांचा हस्तक्षेप नाही...
वादग्रस्त जाहिरातीतून एकत्र आले होते अरबाज-मलायका...
अरबाजपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे मलायका...
मलायकावर खूप प्रेम करतो – अरबाज आणि सोबतच बघा मलायका-अरबाजचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...