आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Here Is What Amitabh Bachchan Says On Shah Rukh's Comment On Abram Aaradhya Jodi

जाणून घ्या, SRKच्या आराध्या-अबराम जोडीवरील स्टेटमेंटवर काय म्हणाले अमिताभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान अमिताभ बच्चन - Divya Marathi
प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान अमिताभ बच्चन
मुंबई. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने 'दिलवाले' सिनेमाच्या प्रेस मीटमध्ये म्हटेल होते, की त्याला अबराम आणि आराध्या बच्चनची जोडी सर्वात जास्त आवडते. भविष्यात दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छासुध्दा व्यक्त केली होती. रविवारी (3 जानेवारी) अमिताभ बच्चन यांना याविषयी विचारल्यानंतर त्यांनी सांगितले, 'शाहरुखच्या तोंडात, तुप-साखर, दूध-मलाई सर्वकाही पडो.' अर्थातच बिग बींचीसुध्दा इच्छा आहे, की अबराम आणि आराध्या भविष्यात एकत्र पडद्यावर दिसावेत.
बिग बी म्हणाले, 'रोबोट' करण्यासाठी रजनिकांत यांनी दिला नकार-
बिग बींनी रविवारी (3 जानेवारी) 'वजीर' सिनेमाच्या पत्रकार परिषदेदरम्यान 'दिग्दर्शक शंकर माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'रोबोट'मध्ये (2010) खलनायकाच्या भूमिकेत घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मी रजनीला फोन केला. त्यांनी सांगितले, की लोक तुम्हाला खलनायकाच्या भूमिकेसाठी स्वीकारणार नाहीत. म्हणून करू नकोस. मी म्हणालो 'ओके'.' बातमी अशीही आली होती, की 'रोबोट 2'मध्येसुध्दा अमिताभ असतील, मात्र त्यांनी याचे खंडन केले होते.
'धूम 4'मध्ये काम करण्याच्या वृत्तावर बोलले अमिताभ-
एका रिपोर्टरने जेव्हा बिग बींना विचारले, की 'धूम 4'मध्ये तुम्ही काम करणार असल्याचे ऐकिवात आहे. यावर बिग बी म्हणाले, की हे मी पहिल्यांदाच ऐकतोय.
मार्चमध्ये सुरु करणार 'आंखे 2'
अमिताभ बच्चन विजॉय नाम्बियारच्या 'वजीर' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय, सुजॉय घोषच्या 'Te3n' आणि 'आंखे 2'मध्येसुध्दा ते दिसणार आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की 'आंखे 2'चे शूटिंग मार्चमध्ये सुरु करणार आहेत.
'वजीर'चे इतर स्टारकास्टही होते उपस्थित-
या पत्रकार परिषदेत अमिताभ बच्चनशिवाय फरहान अख्तर, आदिती राव हैदरी सिनेमाचे दिग्दर्शक विजॉय नाम्बियार आणि निर्माता विधु विनोद चोप्रासुध्दा उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या पत्रकार परिषदेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...