आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीसोबत सुरु आहे अफेअर? जाणून घ्या काय म्हणाला टायगर श्रॉफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी - Divya Marathi
टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी
मुंबई- अभिनेता टायगर श्रॉफ नेहमी अभिनेत्री दिशा पाटणीसोबत दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे अफेअर चालू आहे. अलीकडेच टायगरला याविषयी विचारल्यानंतर त्याने अगदीच चतुराईने उत्तर दिले. टायगर म्हणाला, 'ती माझ्या तुलनेत जास्तच कूल आहे. माझ्या लीगच्या बाहेर आहे.'
दिशाच्या सौंदर्याची प्रशंसा केली...
टायगरने आपले नाते सर्वांसमोर कबूल केले नाही. परंतु त्याने दिशाच्या सौंदर्याची प्रशंसा केली. तो म्हणाला, 'दिशा खूप सुंदर आहे. मला वाटते, की अशी एखादी मुलगी मलाही पटावी. मी सर्वाधिक अनकूल व्यक्ती आहे. अपेक्षा आहे, की 'बागी'नंतर काहीतरी होईल.' यादरम्यान टायगरल विचारले, की तो दिशाचा फक्त फ्रेंड आहे का? तर म्हणाला, 'मी फ्रेंडसी होण्याचा प्रयत्न करतोय.' रिपोर्ट्समध्ये दावा केला, की टायगर दिशाला डान्स मुव्स शिकवण्याचा प्रयत्न करतोय.
कोण आहे दिशा पाटणी...
दिशा पाटणी अभिनेत्री आहे, ती 'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करतेय. ती सुशांत सिंह राजपूतच्या अपोझिट मुख्य भूमिकेत आहे. शिवाय ती चाइनीज सिनेमा 'कुंग फू योगा'मध्येसुध्दा काम करतेय. या सिनेमाच जॅकी चैन मुख्य भूमिकेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दिशा पाटणीचे ग्लॅमरस PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...