आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here\'s How Tara Alisha Berry And Saif Ali Khan Are Related

किरण खेरची सावत्र मुलगी आहे ही अभिनेत्री, सैफ अली खानसोबतही आहे हे खास नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तारा अलीशा बेरी - Divya Marathi
तारा अलीशा बेरी
मुंबई: विक्रम भट यांच्या 'लव्ह गेम्स' या सिनेमात अलीशाची भूमिका साकारणारी तारा अलीशा बेरी सैफ अली खानची कजिन आहे. ताराची आई आणि एक्स मॉडेल राहिलेल्या नंदिनी सेन यांच्या भावाने शर्मिला टागोर यांच्या कजिनसोबत लग्न केले होते. या नात्याने सारा आणि सैफ भाऊ-बहीण झाले. ताराचे बॉलिवूडशी आणखी एक नाते आहे. ताराचे वडील गौतम बेरी अनुपम खेर यांची पत्नी किरण खेर यांचे पहिले पती आहेत. अर्थातच सिकंदर खेर ताराचा सावत्र भाऊ आहे.
तेलगू सिनेमातून सुरु केले करिअर...
27 वर्षांच्या ताराने 2011मध्ये आलेल्या '100% लव्ह' या तेलगू सिनेमातून करिअर सुरुवात केली. ताराने 'मस्तराम' (2014) सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंटी केली होती. त्यानंतर तिने 'परफेक्ट गर्ल' (2015) नावाच्या सिनेमासुध्दा काम केले. या सिनेमाची समीक्षकांनी खूप प्रशंसा केली होती.
शॉर्ट फिल्म्समध्येही केले काम...
सिनेमांशिवाय ताराने अनेक शॉर्ट सिनेमे आणि म्यूझिक व्हिडिओमध्येसुध्दा काम केले आहे. छोट्या पडद्यावर (एपिक चॅनल) प्रसारित होणारा अनुराग बसुच्या “Stories by Rabindranath Tagore" शोमध्ये ताराने काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तारा अलीशा बेरीच्या इंस्टाग्रामवरून घेण्यात आलेले फोटो...