आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Memories: शाहरुख, सनीसह या 12 स्टार्सनी दिल्या होळीच्या आठवणींना उजाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः होळीच्या निमित्ताने दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, शाहरुख खान, सनी लिओन, जॉनी लिव्हर आणि सुनील शेट्टी या स्टार्सनी आमच्यासोबत होळीच्या आठवणींना उजाळा दिला. शाहरुख म्हणाला, 'खास आहे होळी'... 

शाहरुख खान
"माझ्यासाठी ईद एवढाच होळीचा सण खूप खास आहे. माझी पत्नी गौरी हिचा हा आवडता सण आहे. याच कारणामुळे मी लग्नाच्या आधीपासूनच हा सण साजरा करतोय. होळीच्या निमित्ताने मला गौरीला रंग लावण्याची संधी मिळायची. दिल्लीत मी खूप होळी खेळलोय. भांग पिऊन डान्स करणे असो वा, ऑइल पेंट आणि माती खेळणे असो, सर्वकाही मी एन्जॉय केले आहे. सिनेमांत आल्यानंतर मी सभ्य होळी खेळू लागलोय. दरवर्षी कुणाकडे तरी होळीची पार्टी नक्की असते. आम्हीसुद्धा त्या पार्टीमध्ये सहभागी होत असतो. गौरी आणि मला दोघांनाही हा सण खूप आवडतो. त्यामुळे आमच्या घरीसुद्धा होळीची पार्टी झाली आहे."

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बॉलिवूड सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या होळीच्या आठवणी... 
बातम्या आणखी आहेत...