आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या इतका आहारी गेला होता हनी सिंह, आता बायोग्राफीसाठी ऑफर झाले इतके कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर असलेला हनी सिंग सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचे कारण असे की एका पब्लिशरने हनी सिंहला त्याचा बायोपिक बनवण्यासाठी 25 कोटी ऑफर केले आहेत. हनी सिंहकडून या वृत्ताबाबत दुजोरा मिळालेला नाही. बायपोलर डिसऑर्डर विकाराने त्रस्त आहे हनी सिंह...
 
 - यावर्षी मेमध्ये हनी सिंह दोन वर्षानंतर लोकांसमोर आला आणि त्याने सांगितले की, माझ्या फॅन्सला माझ्याबद्दल माहिती देण्यासाठी मला कोणच्याही प्रवक्त्याला पाठवायचे नव्हते. 
 - हनी सिंहने सांगितले की, गेले दीड वर्ष त्याच्या आयुष्याचा सर्वात कठिण काळ होता. तो कोणाशीही बोलण्याच्या कंडिशनमध्ये नव्हता. हनीने सांगितले की, मला माहीत होते लोक माझ्याबद्दल अनेक गोष्टी बोलत आणि लिहीत आहेत.
 - कोणी म्हणतय की ड्रग्ज ओव्हरडोसमुळे मला रिहॅबीटेशन सेंटरला पाठवण्यात आले आहे पण तसे काहीच नाही मी नोएडामध्ये माझ्या घरीच होतो. मला बायपोलर डिसऑर्डर झाला आहे. दारुच्या व्यसनामुळे हा आजार लवकर वाढतो. 
 
 औषधांचा होत नव्हता परिणाम..
 - हनी सिंहने सांगितले की, मी एक नाही तर चार डॉक्टर चेंज केले. मी डिप्रेशनमध्ये होतो आणि औषधांचा परिणामही होत नव्हता. 
 - संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर मला माझ्याच घरच्या लोकांबद्दल भीती वाटायची आणि त्यामुळेच मी स्वतःला घरात कैद केले होते. अनेक महिने तर मी केसही कापले नव्हते. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, कसा ठिक झाला हनी सिंह...
बातम्या आणखी आहेत...