आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनिप्रितला बनायचे होते या अॅक्टरची हिरोईन, बाबाने अशी केली होती प्लानिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक - साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणात राम रहीम 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. पण बाबा तुरुंगात गेल्यानंतर सध्या सर्वाधिक चर्चेत आहे त्याची मानलेली मुलगी हनिप्रित. दोघांबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. बाबाचे नातेवाईक आणि डेऱ्याचे भुपेंद्र गोरा यांनी मीडियाशी बोलताना हनिप्रितबाबत आणखी एक खुलासा केला आहे. 

या अॅक्टरबरोबर हनिप्रितला करायचा होता चित्रपट 
- राम रहीम आणि हनिप्रित यांचे चित्रपटांच्या बाबतचे आणखी एक स्वप्न समोर आले आहे. एका चॅनलच्या माहितीनुसार हनिप्रितला अक्षय कुमार बरोबर चित्रपट करायचा होता. 
- भूपेंद्र गोरा यांच्या मते, बाबा राम रहीम अक्षय कुमारबरोबर मिटींगही करणार होता. त्यात चित्रपटाबाबत चर्चा होणार होती. 
- हनिप्रितला अक्षयशिवाय सलमान खानबरोबरही चित्रपट करायचा होता. बाबा हनिप्रितचा प्रत्येक हट्ट पुरवायचा असे सांगितले जाते. 
- सुत्रांच्या मते, बाबाने मुंबईत 4 आलिशान फ्लॅट खरेदी केले होते. त्याठिकाणी त्याने एक स्टुडिओदेखिल तयार केला होता. त्याचा एक स्टुडिओ सिरसामध्येही आहे. 
- बाबाने बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध टेक्निशियन कायमचे हायर केले होते, असेही सांगितले जाते. 

बाबाला जायचे होते हॉलिवूडला.. 
- हनिप्रितला बॉलिवूडची एवढी क्रेझ होती की, ती इंडियन फिल्म असोसिएशनची लाइफटाइम मेंबरही बनली होती. 
- हनिप्रितने इंडियन फिल्म असोसिएशनमध्ये स्वतःची नोंदणी डायरेक्टर आणि अॅक्टर म्हणून केली होती. 
- राम रहीम हनिप्रितसाठी बॉलिवूडच्या पुढे जाऊन हॉलिवूडमध्ये चित्रपट बनवू इच्छित होता. 
- राम रहीमने चित्रपट बनवण्यामागे एक मोठा गेम खेळला होता. तो या माध्यमातून ब्लॅक मनी व्हाइट करत होता. 

सलमान शाहरुखची फॅन...
- हनिप्रितला चित्रपट तयार करण्याची आणि अॅक्टींगची आवड पूर्वीपासूनच होती. त्यामुळे तिच्या प्रत्येक चित्रपटात हनिप्रित हिरोईन आणि राम रहीम हिरो असायचा. 
- अॅक्टींगबरोबरच तिने बाबाच्या अनेक चित्रपटांचे डायरेक्शनही केले आहे. हनिप्रितला लहानपणापासूनच अॅक्टींगची आवड होती. 
- काही दिवसांपूर्वी एका चॅनलच्या हाती हनिप्रितची सिक्रेट डायरी आली होती. त्यात हनिप्रितने तिला आवडणाऱ्या स्टार्सबाबत लिहिले होते. 
- डायरीच्या पेजवर बॉलिवूड स्टार सलमान-शाहरुख खान आणि आमिर खानचे फोटो होते. 
- हनिप्रितला सर्वात जास्त आवडणारी अॅक्ट्रेस होती काजोल. 

पुढील स्लाइड्सवर पाहा हनिप्रित आणि बाबाचे बॉलिवूड स्टार्सबरोबरचे काही निवडक PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...