मुंबई- असिन आणि मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहूल शर्माचे लग्न 19 जानेवारीला नवी दिल्लीच्या प्रसिध्द लग्झरी हॉटेल दुसित देवरानमध्ये होणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, लग्न हिंदु आणि ख्रिश्चन पध्दतीने होणार आहे. लग्नादरम्यान चर्चमध्ये 50 पाहूणे उपस्थित राहतील. तसेच 200 पाहूण्यांच्या उपस्थित हिंदु पध्दतीने लग्न सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर दिल्लीच्या जवळ स्थित सोनाली फार्महाऊसवर एक छोटेसे गेट-टु-गेदर होणार आहे.
एअरपोर्टपासून 4.5 किमी अंतरावर आहे दुसित देवरान...
NH-8वर स्थित दुसित देवरान इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टपासून जवळपास 4.5 किमी अंतरावर आहे. हॉटेलमध्ये दोन इंटरनॅशनल रेस्तरॉ आहेत. सोबतच एक बारदेखील आहे. तिथे लाइव्ह पियाओचा आनंद घेतला जाऊ शकतो. शिवाय, सर्व चैनीच्या वस्तूसुध्दा मिळतील. त्यामध्ये फ्री वाय-फायपासून इनडोर आणि आऊटडोर स्विमिंग पूलसुध्दा सामील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉटेलचे काही फोटो...