आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशी दिसते अक्षय कुमारची पहिली हिरोईन, 35 व्या वर्षी झाली होती विधवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अक्षय कुमार उद्या 50 वर्षांचा होत आहे. 9 सप्टेंबर 1967 ला जन्मलेला अक्षय 26 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांने 1991 मध्ये डायरेक्टर राज सिप्पी यांचा चित्रपट 'सौगंध'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटात राखी गुलजार यांनी त्याच्या आईची भूमिका केली होती. तर त्याच्या गर्लफ्रेंडच्या रुपात दिसली होती साउथ इंडियातून बॉलिवूडमध्ये आलेली शांतिप्रिया. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण शांतीला बॉलिवूडमध्ये काम मिळत राहिले. 

दाक्षिणात्य सिनेमापासून दुरावली.. 
- 'सौगंध' शांतिप्रियाचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यापूर्वी ती तमिळ, कन्नड आणि तेलुगू भाषांतील चित्रपटांत अॅक्टीव्ह होती. 
- विशेष म्हणजे 'सौगंध' फ्लॉप होऊनही शांतिप्रियाला 'फूल और अंगार' (1993), 'वीरता' (1993) आणि 'इक्के पे इक्का' (1994) सारखे अनेक चित्रपट मिळाले. 
- यादरम्यान ती दक्षिण भारतीय सिनेमापासून दुरावली होती. 

35 व्या वर्षी झाली विधवा 
- इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, ज्यावर्षी शांतिप्रियाने बॉलिवूड डेब्यू केला त्यानंतर सुमारे 9 वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये तिने अॅक्टर सिद्धार्थ रे बरोबर लग्न केले होते. 
- पण 2004 मध्ये 40 वर्षीय सिद्धार्थ यांना गंभीर हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. शांती आणि सिद्धार्थ यांना दोन मुले आहेत. 
- शांतिप्रियाने 'माता की चौकी' आणि 'द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण' सारख्या मालिकांतही काम केले आहे. सध्या ती तमिळ चित्रपट आणि मालिकांत सपोर्टींग रोल करताना दिसते. 

पुढील स्लाइडवर वाचा, काजोलबरोबर केले आहे शांतिप्रियाच्या पतीने काम...

 
बातम्या आणखी आहेत...