आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने कधीच पाहिले नाही शाळेचे तोंड, सलमानने अर्धवट सोडले शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - कतरिना कैफ आणि सलमान खान)
मुंबईः निवडणुकीप्रसंगी प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक पात्रतेसंबंधी चुकीची माहिती सादर करणाऱ्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकेची दिल्ली न्यायालयाने दखल घेतली असून, या याचिकेवर सुनावणी केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसे पाहता, राजकारण असो, किंवा इतर क्षेत्रातील काही लोक असे आहेत, जे कमी शिकलेले असूनदेखील यशस्वी झाले आहेत. बॉलिवूडमध्ये काही उच्चशिक्षित आणि काही कमी शिकलेले सेलिब्रिटी आहेत. एकीकडे अमिताभ बच्चन, विद्या बालन हे स्टार्स उच्चशिक्षित आहेत, तर दीपिका पदुकोण आणि करीना कपूरसह काही सेलिब्रिटींनी आपल्या फिल्मी करिअरसाठी शिक्षण अर्धवट सोडले.
कतरिना कैफ : कधीच गेली नाही शाळेत
बार्बी गर्ल कतरिना कैफचे लंडनमध्ये राहण्याच्या आधी आपल्या कुटुंबीयांसोबत चीन, जपान, फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, जर्मनी, बेल्जियम यांसारख्या अनेक देशांमधून सतत फिरतीवर राहिलीय. त्यामुळे तिने कधीच शाळेचे तोंड बघितले नाही. तिचे शालेय शिक्षण घरीच झाले. लंडनमध्ये 3 वर्षांच्या वास्तव्यादरम्यान कतरिनाने मॉडेलिंग सुरु केले आणि भारतात येऊन 'बूम' सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

सलमान खान : सिंधिया शाळेतून घेतले शिक्षण
'दबंग' सलमान खान काही वर्षे ग्वालियर येथील सिंधिया स्कूलमध्ये शिकला.त्यानंतर मुंबईतील St. Stanislaus High Schoolमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तो केवळ दहावी पास आहे. दहावीनंतर त्याने वांद्रयाच्या नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला मात्र 11 व्या वर्गाची परीक्षाच दिली नाही. त्यामुळे सलमान केवळ दहावीपर्यंतच शिकला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडचे स्टार्स किती शिकले आहेत...