आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Worldstopmost.Com Has Revealed A List Of The Top 10 Most Handsome Faces In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात हॅण्डसम पुरुषांच्या लिस्टमध्ये हृतिक 3rd, सलमान 7th पोजिशनवर: ऑनलाइन सर्वे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसः बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशनचे सिनेमे फारशी कमाल दाखवत नसले, तरीही हृतिकने मात्र लूक्समध्ये बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकले आहे. जगातील टॉप 10 हँडसम पुरुषांच्या यादीत हृतिकने तिसरे स्थान पटकावले आहे. तर याच यादीत अभिनेता सलमान खानच्या नावाचा समावेश असून तो यादीत सातव्या स्थानावर आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ फेम हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुस-या स्थानावर ब्रिटनचा मॉडेल आणि कलाकार रॉबर्ट पॅटिंसन आहे. विशेष म्हणजे या टॉप- 10 लिस्टमध्ये सामील झालेले 5 अॅक्टर हे 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. सर्वात कमी वयाचा अमेरिकन अॅक्टर बिली उंगेर...
- टॉप 10 लिस्टमध्ये अमेरिकन अभिनेता बिली उंगेरला दहावे स्थान मिळाले असून तो या यादीत स्थान पटकावणारा सर्वात कमी वयाचा अभिनेता ठरला आहे. तो केवळ 21 वर्षांचा आहे.
- सर सर्वात जास्त वय असेलला अमेरिकन अॅक्टर टॉम क्रूज (54) पहिल्या स्थानावर आहे.
- टॉप-10 मोस्ट हॅण्डसम मॅन 2016-17 लिस्ट worldstopmost.com वेबसाइटने प्रकाशित केली आहे.
लोकांनी दिले आवडत्या अभिनेत्याला नंबर
- वेबसाइटच्या वतीने यासाठी ऑनलाइन सर्वे केला गेला. यामध्ये जगभरातील लोकांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला वोट केले.
- लिस्टमध्ये ‘ट्विलाइट’ फेम रॉबर्ट पॅटिंसन दुस-या नंबरवर आहे.

टॉप 10 लिस्ट: हृतिकला म्हटले जाते ग्रीक गॉड ऑफ बॉलिवूड

1. टॉम क्रूज- हॉलिवूड हीरो आणि प्रोड्यूसर. वयाच्या 54 वर्षीसुद्धा त्याचा लूक आणि डॅशिंग पर्सनॅलिटी महिलांना आकर्षित करते. टॉम जगातील सर्वात श्रीमंत अभिनेतासुद्धा आहे.
2. रॉबर्ट पॅटिंसन- 30 वर्षीय ब्रिटिश मॉडेल आणि अॅक्टर. गाणीसुद्धा कम्पोज करतो. अद्याप अविवाहित आहे. 2008मध्ये पीपल मॅगझिनने त्याला 'सेक्सिएस्ट मॅन अलाइव" संबोधित केले होते.
3. हृतिक रोशन बॉलिवूड हीरो. 42 वर्षीय हृतिक बॉलिवूडचा प्रसिद्ध कलाकार आहे. त्यांची उंची आणि लूक तरुणींना विशेष आकर्षित करतो. त्याला ‘Greek God of Bollywood’ असे म्हटले जाते.
4.जॉनी डेप- 53 वर्षीय अमेरिकन अॅक्टर आहे. वाढत्या वयाच्या त्याच्या चेह-यावर परिणाम झालेला दिसत नाही. सिनेमांसाठी तो नेहमीच आपल्या लूक विविध प्रयोग करत असतो.
5. टॉम हिडलस्टन- 35 वर्षीय ब्रिटिश अॅक्टर आहे. चार्मिंग फेस आणि चांगल्या हाइटमुळे तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
6.उमर बोरकान अल गाला- 27 वर्षीय उमर मिडल ईस्ट देशांमध्ये प्रसिद्ध आहे. महिलांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. एका चाहतीने त्याला कारसुद्धा गिफ्ट केली आहे.
7. सलमान खान- बॉलिवूड हीरो आणि निर्माता. सलमान वयाच्या 51व्या वर्षीसुद्धा यंग आणि स्मार्ट दिसतो.
8. ब्रॅड पिट- हॉलिवूड सेलिब्रेटी आणि अॅक्टर. 53 वर्षीय ब्रॅड पिट अतिशय लोकप्रिय कलाकार आहे.
9. ह्यू जॅकमॅन- 48 वर्षीय ऑस्ट्रेलियने अॅक्टर, यंग लूक आणि आकर्षक फेससाठी ओळखला जातो. तो एक निर्माता आणि गायकदेखील आहे.
10.बिली उंगेर- 21 वर्षीय अमेरिकन अॅक्टर, टॉप 10 च्या यादीत नाम असलेला सर्वात कमी वयाचा अभिनेता. क्यूट फेसमुळे टीनएज गर्ल्समध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, टॉप 10च्या यादीत सामील झालेल्या अभिनेत्यांचे फोटोज..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...