आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ कोटींच्या मगरीसोबत लढला हृतिक, पाहा पाच दिवस चालेल्या शूटिंगचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंग फोटोज - मगरीचा शोध घेताना हृतिक, आठ कोटींचा खर्च करुन तयार करण्यात आलेला मगर (खाली) - Divya Marathi
शूटिंग फोटोज - मगरीचा शोध घेताना हृतिक, आठ कोटींचा खर्च करुन तयार करण्यात आलेला मगर (खाली)

जबलपूरः अभिनेता हृतिक रोशन आगामी 'मोहन जोदडो' या सिनेमाच्या सिनेमाच्या शूटिंगसाठी सध्या जबलपूर येथे आहे. येथील भेळाघाट येथे पाच दिवस सिनेमातील काही दृश्यांचे शूटिंग झाले. यावेळी हृतिक धोतर आणि कुर्त्यात दिसला. पाचव्या दिवसाच्या शूटमध्ये हृतिक मगरीचा शोध घेऊन त्याच्यासोबत लढाई करतो, असा सीन शूट करण्यात आला. सकाळी 11 वाजता सुरु झालेले शूटिंग संध्याकाळी साडे पाचला संपले.
8 कोटींत तयार झाला 20 फूट लांब मगर
हृतिकने ज्या मगरीसोबत लढाई करतानाचा सीन शूट केला, तो खराखुरा नव्हे तर वीएफएक्सच्या मदतीने तयार करण्यात आलेला मगर होता. यूरोपच्या एका खास टीमने हा मगर तयार केला. 20 फूट लांब असलेल्या या मगरीची किंमत 8 कोटी इतकी आहे.
शूटिंगसाठी करण्यात आलेली खास व्यवस्था
250 क्रू मेंबर्स
07 दिवसांसाठी भव्य सेटची उभारणी
06 मिनिटे रुपेरी पडद्यावर दिसणार भेळाघाट
05 दिवस चालले शूटिंग
104 दिवसांचे शूटिंग गुजरातच्या भूज येथे पार पडले.
सीन 1
'मोहन जोदडो' या आगामी सिनेमाच्या पहिल्या सीनमध्ये हृतिक आपल्या मित्रांसोबत नावेत बसून गप्पा मारण्यात दंग असतो. त्याचवेळी एक मगर त्यांच्या नावेजवळ येतो. हा सीन शूट करण्यासाठी क्रू मेंबर्स वारंवार त्या मगरीला पाण्यात वर-खील करत होते.
सीन - 2
दुस-या सीनमध्ये हृतिकला पाण्याच्या लाटांमध्ये मगर जवळ येत असल्याची शंका येते, त्यामुळे तो आपल्या मित्रांना सतर्क राहण्यास सांगतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, पाच दिवस चाललेल्या शूटिंगची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...