आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Pinky Roshan:Superfit Son Superfit Mom

PHOTOS: 60 वर्षांच्या आहेत हृतिक रोशनच्या MOM, अशा करतात Workout

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वर्कआउट करताना पिंकी रोशन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हिट असण्यासोबतच फिटदेखील आहे. सोशल साइट्सवर तो नेहमी आपल्या चाहत्यांना फिट आणि निरोग राहण्याचा सल्ला देत असतो. लाखो तरुणींना हृतिकच्या सिक्स पॅक अब्सने भूरळ घातली आहे. रोशन फॅमिलीत केवळ हृतिकच नव्हे तर त्याच्या आई पिंकी रोशन यासुद्धा फिटनेस फ्रिक आहेत.
बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांची पत्नी मनीषा रत्नानीने इंस्टाग्रामवर काही छायाचित्रे अपलोड केली आहेत. या छायाचित्रांमध्ये पिंकी रोशन यांच्यासोबत मनीषा रत्नानी आणि त्यांचा ट्रेनर पॉल बिट्टो वर्कआउट करताना दिसत आहेत.
काही वर्षांपूर्वी हृतिकने आपल्या आईला वाढदिवसाच्या निमित्ताने फिटनेसचे स्पेशल गिफ्ट दिले होते. हृतिक त्यांच्या फिटनेस इन्स्ट्रक्टर बनला होता. त्यानंतर पिंकी यांनी काही किलो वजनदेखील कमी केले होते.
हृतिक रोशनच्या आई पिंकी या 60 वर्षांच्या आहेत. या वयातदेखील त्या अगदी फिट आहेत. एकंदरीतच 'फिट बेटा, फिट मॉम, सुपरफिट फॅमिली' असे आपण रोशन कुटुंबीयांविषयी नक्कीच म्हणू शकतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पिंकी रोशन यांची वर्कआउट करतानाची छायाचित्रे...