Home »Gossip» Hrithik Roshan Sister Daughter Sunaina Roshan Suranika Roshan

ही आहे हृतिक रोशनची भाची सुरानिका, सावत्र आईबरोबर आहे अशी बाँडिंग

दिव्य मराठी वेब टीम | Sep 13, 2017, 12:00 PM IST

  • सावत्र आई सोनाली, वडील आशीष सोनी, बहीण आणि मामा हृतिक रोशनबरोबर सुरानिका.
एंटरटेनमेंट डेस्क -हृतिक रोशनच्या कुटुंबातील अनेक मेंबर्स बाबत सर्वांनाच माहिती आहे. पण हृतिकची भाची सुरानिकाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. सुरानिका ही हृतिकची बहीण सुनैना रोशनची मुलगी असून तिचे अमेरिकेत शिक्षण सुरू आहे. सुरानिका आई सुनैनाबरोबर राहत नाही, तर वडील आणि सावत्र आईबरोबर राहते. सावत्र आईबरोबर हृतिकच्या या भाचीची चांगली बाँडिंग आहे.

सुनैनाच्या पहिल्या पतीची मुलगी सुरानिका...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने तिच्या जीवनात दोन वेळा लग्न केले आहे. पहिले लग्न बिझनेसमन आशीष सोनीबरोबर केले होते. 8 वर्षे त्यांचा संसार चालला. त्यानंतर 2000 मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांना एक मुलगी आहे, तिचे नाव सुरानिका आहे. सुनैनापासून विभक्त झाल्यानंतर तिच्या पतीने अॅक्ट्रेस सोनाली मल्होत्राशी लग्न केले. सुरानिका, आशीष आणि सोनालीबरोबरच राहते. सुनैनाने घटस्फोटानंतर बिझनेसमन मोहन नागरबरोबर लग्न केले.

शेयर करते फोटो..
19 वर्षांची सुरानिका हिती सावत्र आई आणि बहिणीबरोबर चांगली बाँडिंग आहे. तिघी खूप एन्जॉय करतात. सुरानिका रोशन कुटुंबाबरोबर मात्र फारशी दिसत नाही. तिने सोशल मीडियावर वडील आशीष सोनी, आई सोनाली आणि बहिणीबरोबर अनेक फोटो शेयर केले आहेत. काही मोजक्या फोटोत ती रोशन फॅमिलीबरोबर झळकली आहे. सुरानिका मित्रांबरोबरची भरपूर मस्ती करते. सोशल मीडियावर मित्रांबरोबरचे तिचे अनेक फोटो आहेत.

सुनैनाला होता सर्व्हायकल कँसर
सुरानिकाची आई सुनैनाने कँसर सारख्या गंभीर आजाराशी लढा दिला आहे. तिला सर्व्हायकल कँसर होता. वडिलांबरोबर 'क्रेझी 4' चे शुटिंग सुरू असताता तिला चांगलेच ब्लडींग झाले होते. त्यानंतर टेस्ट केल्यावर तिला कँसर असल्याचे समजले. कीमोथेरपीमुळे तिचे केस गळाले होते. त्यामुळे ती डीप्रेशनमध्येही गेली. पण आता ती या सर्वातून बाहेर आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सुरानिकाचे फॅमिलीबरोबरचे 6 फोटोज...

Next Article

Recommended