आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... 'मोहंजोदडो'साठी चक्क सिंहाच्या गराड्यात लढणार हृतिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक चित्रपटात नावीन्यपणा आणून आपल्या अॅक्शन भूमिकाने प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या हृतिक रोशनने 'मोहंजोदडो'ची प्रेक्षकांमधील उत्सुकता कायम ठेवली आहे. आशुतोष गोवारीकरांनी या चित्रपटाबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नसला तरी सूत्रांनी चित्रपटाची कथा मिळवण्यात यश मिळवले.
चित्रपटात हृतिकचा सिंहाशी सामना करतानाचे एक दृश्य असून त्यासाठी तो सध्या प्रशिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक हा खुलासा हृतिकचे फिटनेस ट्रेनर सत्यजित चौरसियांनी केला आहे. चौरसिया सध्या अशाप्रकारच्या दृश्यांसाठी आवश्यक असलेली शरीरयष्टी बनविण्याचे प्रशिक्षण हृतिकला देत आहेत.
'मोहंजोदडोसाठी हृतिक भरपूर मेहनत घेत असून आपली शरीरयष्टी चित्रपटात सुयोग्य दिसावी यादृष्टीनेही तो प्रयत्न करत आहे. सत्यजित चौरसिया हे अनेक सेलिब्रिटींचे व्यायाम प्रशिक्षक राहिले आहेत. 'गजनी' चित्रपटातील 'एट पॅक अॅब्स' लूकचे श्रेय देखील चौरसिया यांनाच जाते.
बातम्या आणखी आहेत...