आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hum Saath Saath Hai Completed 16 Years Of Its Released, See The Cast Then And Now

\'हम साथ साथ है\' @18: आता असे दिसतात हे 24 स्टार्स, तर हे 5 सेलिब्रिटी नाहीत या जगात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजश्री प्रॉडक्शनच्या 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या रिलीजचा नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहे. 5 नोव्हेंबर 1999 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा त्यावर्षातील सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित कौटुंबीक धाटणीच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते.
 
दीड दशकांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमात सलमान खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, मोहनीश बहल, करिश्मा कपूर, सैफ अली खान, महेश ठाकूर,  नीलम, रिमा लागू, आलोकनाथ, सदाशिव अमरापूरकर, सतीश शाह, शक्ती कपूर, अचित वाच्छानी, जयश्री टी. यांच्यासह कलाकारांची मौठी फौज होती. या सिनेमाच्या रिलीजनंतर तब्बल 16 वर्षांनी सूरज बडजात्या आणि सलमान खान ही जोडी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आली होती.
 
'हम साथ साथ है' या सिनेमात कौटुंबीक मुल्ये, प्रेम, समर्पण, मैत्री, त्यागाचे उत्कृष्ट दर्शन घडवले होते. या सिनेमातील अनेक कलाकार आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. तर काही सेलिब्रिटींनी कायमचा या जगाचा निरोप घेतला आहे. 
 
या सिनेमाच्या रिलीजला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या सिनेमातील स्टारकास्ट आता कशी दिसते आणि या सिनेमात झळकलेले कोणते सेलिब्रिटी आता या जगात नाहीत, ते जाणून घ्या... 
बातम्या आणखी आहेत...