आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्यूट इमेज पुसून काढण्यासाठी या अॅक्ट्रेसने केले आहेत अनेक सेक्सी फोटोशूट्स, तुम्हीही पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री इलियाना डीक्रूजने नुकताच आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. 1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत समीरा डीक्रूज आणि रोनाल्डो डीक्रूज यांच्या घरी जन्मलेली इलियाना बॉलिवूडची क्यूट अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. मात्र आपली ही क्यूट गर्लची इमेज पुसून काढण्यासाठी इलियानाने अनेक बोल्ड फोटोशूट्स केले आहेत. इतकेच नाही तर पेटा (PETA) साठी टॉपलेस होण्याचे धाडसही तिने दाखवले आहे.
वयाच्या 19 व्या वर्षी 'देवदासू' या तेलगू सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या इलियानाने अनुराग बासूंच्या 'बर्फी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. 'बर्फी'नंतर इलियाना ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हीरो’ और ‘हॅपी एंडिंग’ या सिनेमांमध्ये झळकली आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.
इलियाना खासगी आयुष्यातदेखील बोल्ड आहे. सिनेमांव्यतिरिक्त सोशल मीडियावर ती नेहमी अॅक्टिव असते. आपल्या सेक्सी इमेज कायम ठेवण्यासाठी इलियाना सोशल नेटवर्किंग अकाउंटवर स्वतःचे ग्लॅमरस फोटोज पोस्ट करत असते.
पाहुयात, इलियानाचे लक्ष वेधून घेणारे निवडक ग्लॅमरस PHOTOS...