आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BA Pass-2 मध्ये झळकणार 18 वर्षांची ही अॅक्ट्रेस, शेयर केल्या Life शी संबंधित बाबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगडमध्ये मीडियासमोर आल्यानंतर कृतिका - Divya Marathi
चंदिगडमध्ये मीडियासमोर आल्यानंतर कृतिका
चंदिगड - डायरेक्टर शाहदाब खान आणि प्रोड्युसर नरेन्द्र सिंह यांनी त्यांच्या बीए पास 2 चित्रपटासाठी युवा शक्ती ही थीम पडद्यावर सशक्तपणे मांडू शकेल अशा चेहऱ्याची गरज होती. चंदिगडच्या 18 वर्षीय कृतिका सचदेवपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा शोध संपला. कृतिकाला ग्लॅमर जगतात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तिचा पहिला चित्रपट 'बीए पास 2' च्या रिलीजपूर्वी ती चंदिगडमध्ये आली होती. याठिकाणी तिने मीडियाशी चर्चा केली. 

अशाच भूमिकेच्या शोधात होती कृतिका 
- हा चित्रपट बीए पास चा सिक्वेल आहे. 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. 
- या चित्रपटाबाबत कृतिका खूप उत्साहात आहे. 
- चित्रपटांत काम करयाचे असल्याने तिने सब आणि स्टारवरील टीव्ही शोकडे दुर्लक्ष केले. 
- हवा तसा रोल मिळाल्याने आनंदी असल्याचे कृतिकाने म्हटले आहे. 
- अॅक्टींगसाठी कोर्स केला नसल्याचे कृतिकाने सांगितलसे आहे. 
- पुढच्या पाच वर्षात यशस्वी अॅक्ट्रेस व्हायचे असल्याचे कृतिका म्हणते. 
- इंडस्ट्रीत प्रत्येकाची स्टाइल वेगळी आहे, त्यामुळे कोणीही आदर्श नसल्याचे कृतिका म्हणते. 
 
दुःखद अंत.. 
- डायरेक्टर शाहदाब खानही ग्लॅमर जगतात नवीन नाहीत. प्रसिद्ध मॉडेल असून त्यांनी जिलेट, रेमंड्स अशा ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केले आहे. 
- त्यांनी सांगितले की, हा चित्रपट तरुणांना एकच संदेश देतो. तो म्हणजे तरुणांनी आपल्यातील कला योग्यपणे ओळखावी आणि योग्य पर्याय निवडून करिअर करावे. 
- स्वातंत्र्य हिरावले जाऊ नये म्हणून कुटुंबापासून दूर जाणाऱ्या एका तरुणीची ही कथा आहे. 
- तरुणीची लाईफ अत्यंत स्ट्रगलमधून जाते आणि तिचा वेदनादायी असंत होतो.  
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...