आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Including Raj Kapoor And Nargis Bollywood Stars Who Could Not Marry Their Love

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 बॉलिवूड कपल्स, चर्चेत राहिले प्रेम मात्र होऊ शकले नाही लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः नर्गिस आणि राज कपूर, सलमान खान आणि ऐश्वर्या राय, शाहिद कपूर आणि करीना कपूर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज 86 वी जयंती आहे. 1 जून 1929 रोजी मोहनबाबू आणि जद्दनबाई यांच्या घरी नर्गिस यांचा जन्म झाला.
बालकलाकाराच्या रुपात घेतली सिनेसृष्टीत एन्ट्री
नर्गिस यांनी वयाच्या सहाव्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांच्या पहिल्या सिनेमाचे नाव हो तलाश-ए-हक. 1935 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानंतर फातिमा रशीदहून त्यांचे नाव नर्गिस पडले. 1941 मध्ये रिलीज झालेला तकदीर हा त्यांचा लीड अॅक्ट्रेसच्या रुपात पहिला सिनेमा होता. या सिनेमात मोतीलाल हे त्यांचे हीरो होते. या सिनेमात त्या केवळ 14 वर्षांच्या होत्या.
राज कपूर होते नर्गिस यांचे पहिले प्रेम
बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर उत्कृष्ट अभिनयासाठी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. राज कपूर यांचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. मात्र नर्गिस यांच्याविषयी बोलायचे झाल्यास राज कपूर त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. 'आग' या सिनेमाद्वारे राज कपूर आणि नर्गिस यांनी एकत्र काम करायला सुरुवात केली होती. तर 'बरसात' या सिनेमापासून त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. त्यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री ऑफ स्क्रिन स्पष्ट झळकत होती. या जोडीने एकत्र अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले.
नर्गिस यांनी राज कपूर यांच्यासोबत एकुण 16 सिनेमे केले, त्यापैकी सहा सिनेमे हे आर. के. बॅनरचे होते. ‘आग’, ’बरसात’, ’अंदाज’, ’आवारा’, ’आह’, ’श्री 420’, ’जागते रहो’ आणि ‘चोरी-चोरी’ हे या जोडीचे गाजलेले सिनेमे आहेत.
विवाहित होते राजकपूर, म्हणून होऊ शकले नव्हते लग्न
नर्गिस 19 वर्षांच्या असताना राज कपूर यांची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात झाली होती. मात्र या दोघांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकू शकले नव्हते. कारण राज कपूर विवाहित होते. नर्गिस यांनी राज यांना त्यांची पत्नी कृष्णा यांच्यापासून घटस्फोट घेण्यास सांगितला होता. मात्र राज कपूर यांनी तसे केले नाही. त्यानंतर नर्गिस यांनी दहा वर्षे राज कपूर यांची वाट बघितली. मात्र राज कपूर त्यांच्या आयुष्यात परतले नाही. राज कपूर यांनी पत्नी आणि मुलांनो सोडू शकत नसल्याचे नर्गिस यांना सांगितले होते.
सुनील दत्त आयुष्यात येण्यापूर्वी नर्गिस यांनी केला होता आत्महत्येचा विचार
राज कपूर यांच्यानंतर सुनील दत्त नर्गिस यांच्या आयुष्यात आले. मेहबूब खान यांच्या मदर इंडियात त्यांनी एकत्र काम केले होते. सुनील दत्त नर्गिस यांच्या मुलाच्या भूमिकेत होते. या सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेल्या एका घटनेने नर्गिस आणि सुनील यांना जवळ आणले होते. सिनेमातील आगीचे दृश्य चित्रीत होत होते. मात्र त्याचवेळी अचानक नर्गिस आगीत अडकल्या. सुनील दत्त यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नर्गिस यांचे प्राण वाचवले होते. या घटनेनंतर नर्गिस सुनील दत्त यांच्या प्रेमात पडल्या. असे म्हटले जाते, की सुनील दत्त यांना भेटण्यापूर्वी नर्गिस यांनी आत्महत्येचा विचार केला होता.
बॉलिवूडमध्ये नर्गिस आणि राज कपूर एकमेव कपल नाहीये, ज्यांचे प्रेम अधुरे राहिले. divyamarathi.com आपल्या वाचकांना बॉलिवूडमधील अधु-या राहिलेल्या प्रेमप्रकरणांविषयी सांगत आहे...