आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या भावापासून ते श्वेता तिवारीपर्यंत, PAK फिल्म्समध्ये झळकले हे 22 इंडियन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेले सर्जिकल स्ट्राइक यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच झी जिंदगी वाहिनीवरी पाकिस्तानी मालिकाही बंद करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर लवकरच रिलीज होणा-या करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे सीन्स वगळून आता सैफ अली खानवर ते चित्रीत करण्यात येणार आहेत. तर शाहरुखच्या 'रईस' सिनेमातून माहिरा खानचा पत्ता कट झाला आहे. या बंदीपूर्वी पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडमध्ये ब-यापैकी सक्रिय होते. पाकिस्तानी कलाकारच नव्हे तर बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकारांनीही पाकिस्तानी सिनेमांमध्ये काम केले आहे. या कलाकारांविषयी जाणून घेऊया.

पाकिस्तानी सिनेमात झळकला होता सलमानचा भाऊ...
2007 मध्ये रिलीज झालेल्या 'गॉडफादर' या सिनेमात अरबाज खानने काम केले होते. हा सिनेमा हॉलिवूडच्या 'सेम' या सिनेमाचा रिमेक होता. असलम भाटी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

श्वेता तिवारी
'कसौटी जिंदगी की', 'परवरिश' आणि 'बेगुसराय' या मालिकांमध्ये झळकलेली टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी हिने पाकिस्तानी चित्रपट 'सल्तनत' मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. 2004 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. सिनेमातील बरेचसे शूटिंग दुबईत झाले होते. सिनेमातील श्वेताच्या ग्लॅमरस भूमिकेला पाकिस्तानी लोकांनी अश्लिल म्हटले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी कोणकोणते भारतीय कलाकार पाकिस्तानी फिल्म्समध्ये झळकले आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...