आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युषा बॅनर्जीच नव्हे, या सेलेब्सहीची मृत्यूनंतर शेवटची छायाचित्रे आली होती समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई. प्रत्युषा बॅनर्जीसोबत 'Bigg Boss 7'मध्ये दिसलेला टीव्ही अभिनेता एजाज खानने तिच्या फ्यूनरलचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला. सोबत त्याने लिहिले, 'हा माझी मैत्रीण प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूनंतरचा फोटो... जर ही आत्महत्या होती तर तिच्या डोळ्याखाली मारहाणीचे व्रण कसे? नाकावर जखम कसली? ओठांवर मारहाण केल्याच्या जखमा कशा?'
एजाज असेही म्हणाला...
- एजाजने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले, की त्याची लढाई सत्यासाठी आहे.
- त्याने पुढे लिहिले, 'मला माझ्या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत. पोलिस या प्रकरणाला आत्महत्या असल्याचे सांगून बंद करत आहेत, म्हणून मी आवाज उठवणार आहे. मला माझ्या मैत्रीणीसाठी न्याय हवा आहे. प्लीज सपोर्ट मी.'
- प्रत्युषाने 1 एप्रिलला गोरेगावमधील राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.
- तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहने तिला कोकिलाबेन रुग्णालयात नेले होते. मात्र नंतर राहुल तिला तिथेच सोडून निघून गेला होता.
- प्रत्युषाचे कुटुंबीय आणि मित्र याला प्लान मर्डर मानत असून राहुलला गुन्हगार म्हणत आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांना 10 दिवसांनंतरसुध्दा काहीच हाती लागले नाहीये.
प्रत्युषापूर्वी अनेक सेलेब्सचे मृत्यूनंतरचे फोटो समोर आले आहेत. सेलेब्स शेवटचे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...