Home »Gossip» 12 Famous Bollywood Celebrities Who Got Secretly Married

गुपचुप लग्न थाटण्याच्या तयारीत आहेत 'बाहुबली-देवसेना', या 12 सेलेब्सनी गुपचुप उरकले होते लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:04 PM IST

दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांच्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटानंतर प्रभास आणि अनुष्काच्या नात्याविषयी सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. अलीकडेच हे दोघे यावर्षी डिसेंबरमध्ये साखरपुडा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. नऊ वर्षांपासून प्रभास आणि अनुष्का एकमेकांना ओळखतात. पण कधीही त्यांनी आपले नाते सार्वजनिक होऊ दिले नाही.
विशेष म्हणजे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभासने म्हटले की, ‘आमच्याबद्दल होणाऱ्या चर्चांचा परिणाम एकमेकांवर होऊ द्यायचा नाही, असं आम्ही दोघांनी ठरवलं आहे. गेल्या नऊ वर्षांपासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात चांगली मैत्री आहे. इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याने जेव्हा रिलेशनशिपच्या चर्चा ऐकू येतात, तेव्हा खरंच मी विचार करायला लागतो की आमच्यात असं काही आहे का? (हसतो) पण, असं काहीच नाहीये. यात नवीन काही नाही. एकापेक्षा अधिक चित्रपटांमध्ये जेव्हा त्याच अभिनेत्रीसोबत भूमिका साकारतो तेव्हा साहजिकच लोकांमध्ये चर्चा होऊ लागतात.’

आता प्रभास असं म्हणत असला, तरी साखरपुड्याच्या वृत्तामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. आता यावर अनुष्का काय म्हणते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच काय तर एवढी वर्षे रिलेशन लपवून ठेवणारे हे दोघे येणा-या काळात गुपचुप लग्न थाटण्याच्या तयारीत दिसत आहे.
प्रभास आणि अनुष्का यांच्याप्रमाणेच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या प्रेमाची कुणकुण कुणालाही लागू दिली नाही. अनेकांनी गुपचुप लग्न थाटून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. अगदी प्रीती झिंटापासून ते हृषिता भट, राणी मुखर्जी, आफताब शिवदासानी, कुणाल कपूरसह अनेक सेलेब्सची नावे यात सामील आहेत.

हृषिता भट
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हृषिता भट हिने वयाच्या 35 व्या वर्षी गुपचुप लग्न थाटले. 4 मार्च 2017 रोजी यूनाइटेड नेशनचे सीनिअर डिप्लोमेट आनंद तिवारीसोबत हृषिताने सप्तपदी घेतल्या. सहा महिने डेटिंग केल्यानंतर या जोडीने फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्सच्या उपस्थितीत लग्न थाटले. एका एन्टरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हृषिता म्हणाली होती, "आमच्या लग्नात केवळ फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्स सहभागी झाले होते. आम्हाला हा सोहळा अतिशय खासगी ठेवायचा होता. आमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छ आणि आशीर्वाद हवे आहेत."
प्रीती झिंटा
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने वयाच्या 41 व्या वर्षी बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केले आहे. जीन प्रितीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. हा लग्नसोहळा अगदी गुपचुप पध्दतीने पार पडला. वेडिंग सेरेमनी लॉस एंजिलिसमध्ये झाली होती. प्रितीने क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सच्या उपस्थित जीनसोबत सप्तपदी घेतल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या गुपचुप लग्नगाठीत अडकलेल्या आणखी काही सेलेब्सविषयी...

Next Article

Recommended