आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2018: \'2.0\' पासून ते \'ठग्स ऑफ हिन्दोस्तां\'पर्यंत, नवीन वर्षांत रिलीज होणार हे 23 बिग बजेट चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 2017 हे वर्ष आता सरत आले आहे. यावर्षी बॉलिवूडने अनेक सुपरहिट तर काही फ्लॉप चित्रपट दिले. आता सगळ्यांचे लक्ष 2018 या नवीन वर्षावर लागले आहे. नवीन वर्षाची सुरुवात 2.0 या मोठ्या बजेटच्या चित्रपटाने होणार आहे. नवीन वर्षांत रिलीज होणा-या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, विविध धाटणीचे चित्रपट रिलीज होणार आहेत.

 

एकीकडे '2.0' सारखा सायन्स फिक्शनवर आधारित चित्रपट रिलीज होणार आहेत, तर दुसरीकडे 'पॅडमॅन' हा ड्रामा चित्रपट आणि संजय दत्तच्या बायोपिकच्या रिलीजची प्रतिक्षा आहे. इतकेच नाही तर नवीन वर्षांत स्टार किड्स मोठ्या पडद्यावर अवतरणार आहेत. यामध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर आणि अमृता सिंग-सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यांच्या नावांचा समावेश आहे. जान्हवी आणि ईशान 'सैराट' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'मधून फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेणार आहे, तर दुसरीकडे सारा 'केदारनाथ' या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, 2018 या नवीन वर्षांत कोणते बिग बजेट आणि बिग बॅनरचे 22 चित्रपट होणार आहेत रिलीज...  

बातम्या आणखी आहेत...